For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोयडामध्ये 3.80 लाख रुपये जप्त

07:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
नोयडामध्ये 3 80 लाख रुपये जप्त
Advertisement

नोयडा : लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून आदर्श आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रेटर नोयडा येथे झालेल्या तपासणीत एका व्यक्तीकडून 3.80 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले असून या रकमेच्या स्रोताची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशात अशा प्रकारच्या तपासणीत 31 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. 3.80 लाख रुपयांची ही रक्कम अनुमती दिलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्याने कारवाई करण्यात आली, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातच एका डॉक्टरकडून 10 लाख रुपये जप्त करण्यात आले होते. ही रक्कम लोकसभा निवडणुकीशी संबंधित होती. त्यामुळे कारवाई करण्यात आली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.