महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दुसरी विश्व पात्रता फेरी मुष्टियुद्ध स्पर्धा आजपासून

06:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /बँकॉक

Advertisement

येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट मिळविण्यासाठी भारतीय मुष्टियोद्ध्यांना आता शेवटची संधी उपलब्ध झाली आहे. येथे शुक्रवारपासून दुसरी विश्व पात्रता फेरी मुष्टियुद्ध स्पर्धा सुरु होणार असून अमित पांघलच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष राहिल. अलिकडच्या झालेल्या काही ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या मुष्टियुद्ध स्पर्धांमध्ये भारतीय स्पर्धकांची कामगिरी अत्यंत निराशजणक झाली आहे. यापूर्वी झालेल्या शेवटच्या पात्र फेरी स्पर्धेपर्यंत 4 भारतीय मुष्टियोद्ध्यांना कोटा पद्धतीनुसार संधी निर्माण झाली होती. पण भारताची महिला मुष्टियोद्धी परवीन हुडावर 22 महिन्यांच्या कालावधीकरीता निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने आता भारताच्या 3 मुष्टियोद्ध्यांना कोटा पद्धतीनुसार संधी राहिल. परवीन हुडाने यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये 57 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. गेल्या मार्चमध्ये झालेल्या पहिल्या विश्व पात्र फेरीच्या मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्ध्यांची कामगिरी अत्यंत निराशाजअ झाली होती. आणि त्या स्पर्धेत भारताचा एकमेव मुष्टियोद्धा तसेच 2023 च्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्यपदक विजेता निशांत देव याला केवळ पहिली फेरी पार करता आली होती. सध्या भारतीय मुष्टियुद्ध संघाला सी. ए. कुट्टाप्पा यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

अखिल भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनने शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या विश्व पात्रता फेरीच्या स्पर्धेसाठी आपल्या संघात बरेच बदल केले आहेत. 51 किलो वजन गटात भारताच्या दिपक भोरियाला पहिल्या दोन पात्रता फेरीच्या स्पर्धांमध्ये विजय नोंदविता आला नाही. आता अमित पांघलला 51 किलो वजन गटातून उतरविले जाणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतातर्फे अमित पांघल हा एकमेव मुष्टियोद्धा पात्र ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 63.5 किलो गटात अनुभवी मुष्टियोद्धा शिवा थापाची कामगिरी समाधानकारक झाली नाही. 80 किलो वजन गटात अभिमन्यू लोराच्या जागी लक्ष्य चहरला या स्पर्धेत संधी देण्यात आली आहे.

महिलांच्या विभागात 66 किलो गटात अंकुशिता बोरो भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. या गटातून जस्मिन लंबोरियाच्या जागी बोरोला संधी देण्यात आली आहे. यापूर्वी झालेल्या दोन पात्रता फेरी स्पर्धांमध्ये जस्मिनची कामगिरी चांगली झाली नाही. भारताची राष्ट्रीय विजेती अरुंधती चौधरी 66 किलो गटात उतरणार आहे. पॅरिस ऑलिम्पिसाठी आतापर्यंत विश्व पात्रता फेरी आणि आंतरखंडिय पात्रता स्पर्धांमधून विविध देशांचे सुमारे 188 स्पर्धकांनी आपले तिकीट निश्चित केले आहे. शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत एकूण कोटा पद्धतीनुसार 51 मुष्टियोद्ध्यांना पॅरिस ऑलिम्पिकची ऑफर राहिल. या स्पर्धेत भारतातर्फे पुरुष विभागात 28 तर महिला विभागात 23 स्पर्धक भाग घेत आहेत. सदर स्पर्धेमध्ये विविध वजन गटातून उपांत्य फेरी गाठणारा स्पर्धक पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरेल. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताच्या 9 मुष्टियोद्ध्यांनी भाग घेतला होता. आणि केवळ लोवलिना बोर्गोहेनने भारताला एकमेव कांस्यपदक मिळवून दिले होते. आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या निखत झरिन, प्रिती पवार, बोर्गोहेन यांनी गेल्या वर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे. शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत भारतातर्फे पुरुष विभागात अमित पांघल, सचिन सिवाच ज्युनिअर, अभिनेश जमवाल, निशांत देव, अभिमन्यू लोरा, संजित नरेंद्र बेरवाल, महिला विभागात जस्मिन लंबोरिया, अंकुशिता बोरो आणि अरूंधती चौधरी भाग घेत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article