जादा पैशाचे आमिष दाखवून महिलांना 29 लाखांचा गंडा
रत्नागिरीतील राजीवडा येथील प्रकार; 31 महिलांची झाली फसवणूक, दोघांविरूध्द गुन्हा
रत्नागिरी पतिनिधी
शहरातील राजीवडा येथे जादा पैसे देण्याचे आमिष दाखवून महिलांची 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा पकार समोर आला आह़े हानिफा साजिद मिरकर (35, ऱा राजीवडा रत्नागिरी) यांनी या पकरणी शहर पोलिसांत तकार दाखल केल़ी यामध्ये एकूण 31 महिलांची फसवणूक झाली असल्याचे मिरकर यांनी तकारीत नमूद केले आह़े पोलिसांनी या पकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा.
फरहत इम्रान वस्ता व इम्रान यासीन वस्ता (ऱा राजीवडा रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहत व इम्रान वस्ता यांनी राजीवडा येथे तकारदार यांच्यासह महिलांचे गट तयार केल़े तसेच या महिलांना वेगवेगळ्dया फायनान्स कंपनीत नेवून त्यांच्या नावे कर्ज काढून दिले होत़े दरम्यान संशयितांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी व पुणे येथे कोर्टात सुरू असलेल्या केससाठी पैशाची गरज असल्याचे या महिलांना सांगितल़े तसेच या महिलांना जेवढे पैसे घेतले, त्यापैक्षा जास्तीचे पैसे देण्याचे आमिष संशयितांनी दाखवले, असा आरोप ठेवण्यात आला आह़े.
संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून विविध गटातील 31 महिलांनी जानेवारी 2023 ते 30 जून 2024 या कालावधीत सुमारे 29 लाख रुपये त्यांना दिल़े पैसे स्वीकारुन संशयित हे आपले पैसे परत करत नसल्याने आपली फसवणूक करण्यात आल्याचे या महिलांच्या लक्षात आल़े त्यानुसार या महिलांपैकी हानिफा मिरकर यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तकार दाखल केल़ी पोलिसांनी या पकरणी संशयितांविरुद्ध भारतीय न्यायसंहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आल़ा