29 कोटी 40 लाखांच्या शहर स्वच्छतेसाठी निविदा
मनपाने एकूण 16 निविदांबाबत मागविले अर्ज : 21 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
बेळगाव : शहर स्वच्छ करण्यासाठी दरवर्षी स्वच्छता कर्मचाऱ्यांसह वाहनचालक, सुपरवायझर यासाठी निविदा काढली जाते. आता महानगरपालिकेने एकूण 16 निविदा काढल्या असून 29 कोटी 40 लाखांच्या या निविदा आहेत. स्वच्छता कर्मचारी, वाहने, तसेच चालक आणि सुपरवायझर पुरविण्याबाबत ही निविदा काढण्यात आली आहे. त्यासाठी 21 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. याबाबत महानगरपालिका आयुक्तांनी आदेश जारी केला आहे.
शहरातील वॉर्ड क्रमांक 29, 30, 53, 54 साठी 1 कोटी 93 लाख रुपये, वॉर्ड क्र. 40, 41, 50, 56 साठी 1 कोटी 97 लाख, वॉर्ड क्र. 42, 43, 44 साठी 1 कोटी 95 लाख, वॉर्ड क्र. 51, 52, 57, 58 साठी 1 कोटी 88 लाख, वॉर्ड क्र. 27, 28 आणि 49 साठी 1 कोटी 93 लाख, वॉर्ड क्र. 16, 21, 22, 23, 24 साठी 1 कोटी 97 लाख, वॉर्ड क्र. 6, 9, 10, 15, 3 यासाठी 1 कोटी 97 लाख, वॉर्ड क्र. 1, 2, 4, 5, 7 साठी 1 कोटी 98 लाख, वॉर्ड क्र. 8, 11, 12, 17 साठी 1 कोटी 96 लाख, वॉर्ड क्र. 31, 32, 33, 34 साठी 1 कोटी 75 लाख, वॉर्ड क्र. 13, 18, 19, 26 साठी 1 कोटी 72 लाख, वॉर्ड क्र. 14, 20, 38 साठी 1 कोटी 48 लाख, वॉर्ड क्र. 35, 36, 37 साठी 1 कोटी 56 लाख, वॉर्ड क्र. 46, 47, 48 साठी 1 कोटी 79 लाख, वॉर्ड क्र. 25, 45, 55 साठी 1 कोटी 70 लाख, तसेच स्वच्छता कर्मचारी, चालक, मदतनीस यांच्यासाठी 1 कोटी 86 लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे.
प्रभागांची सफाई करण्यासाठी या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यासाठी 21 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावे लागणार आहेत. इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. एकूण 29 कोटी 40 लाख रुपयांच्या 16 निविदा काढण्यात आल्या आहेत.