For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभिषेक सोहळ्याला 28 दिवस बाकी!

06:27 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
अभिषेक सोहळ्याला 28 दिवस बाकी
Advertisement

अयोध्या राममंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात :  न्यासाकडून छायाचित्रे जारी

Advertisement

► वृत्तसंस्था/ अयोध्या

अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठेची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे देशातील वातावरण अधिकच उत्साही होत आहे. 22 जानेवारीला भगवान राम भव्य महालात विराजमान होणार आहेत. या सोहळ्याला आता 28-29 दिवस उरले आहेत. राम मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम प्रभू रामाच्या सिंहासनापर्यंत पूर्ण झाले आहे. भव्य-दिव्य मंदिराचे कोरीव काम रामभक्तांना मंत्रमुग्ध करत आहे.

Advertisement

मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामनगरी अयोध्येतील मंदिराचे बांधकाम अंतिम टप्प्यात आल्याची छायाचित्रे रविवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने जारी केली. जसजशी अभिषेकाची तारीख जवळ येत आहे, तसतशी राम मंदिराची भव्यताही अलौकिक दिसू लागली आहे. 22 जानेवारीला प्रभू राम आपल्या भव्य महालात विराजमान होणार आहेत. प्रभूरामाच्या मंदिरातील बांधकाम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. राम मंदिराचा सिंहद्वार सज्ज झाला आहे. इतकेच नाही तर रामलल्लाच्या तीन मूर्तींचे बांधकामही पूर्ण झाले आहे. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर सुमारे 161 खांब बसवण्यात आले आहेत. या खांबांवर देवी-देवतांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत. राम मंदिराच्या प्रत्येक खांबावर देवी-देवतांच्या मूर्ती बनवल्या जात असल्याचे छायाचित्रांमध्ये दिसत आहे.

मंदिराचे बांधकाम नगर शैलीत केले जात आहे. मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम राजस्थानच्या बन्सी टेकडीवर कोरलेल्या दगडांनी सुरू आहे. राम मंदिराभोवती तटबंदीसह संरक्षक भिंत बांधली जात आहे. अभिषेक करण्यापूर्वी मंदिराच्या बांधकामाला अंतिम स्वरुप देण्यात येत आहे. 22 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यजमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या कार्यक्रमासाठी 8,000 विशेष अतिथींना आमंत्रित करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.