महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पवित्र पोर्टलमधील 274 शिक्षकांना अखेर नियुक्ती

11:13 AM Jun 15, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

सांगली प्रतिनिधी

प्राथमिक शिक्षणकडील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण होताच पवित्र पोर्टलमधून जिल्ह्यात दाखल झालेल्या 274 शिक्षकांना अखेर नियुक्ती देण्यात आली. साडेतीन महिन्यांपूर्वी पवित्रमधून शिक्षक आले होते, परंतु उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे नियुक्ती थांबवली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडामिसे यांनी नूतन शिक्षकांना जिल्ह्याची भौगोलिक रचना समजावून गुणवत्ता अधिक वृध्दींगत करावी, असे आवाहन केले.

Advertisement

येथील वसंतदादा पाटील सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी धोडामिसे यांच्या अध्यक्षतेखाली पवित्रमधील शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या उपस्थित होते. प्राथमिक शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमधूप 481 शिक्षकांची मागणी केली होती, त्यापैकी 274 शिक्षक प्राप्त झाले. त्यामध्ये मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा समावेश आहे. मार्च महिन्यात शिक्षकांच्याकागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर वार्षिक परीक्षा आणि उन्हाळी सुट्टी असल्याने शिक्षकांच्या नियुक्त्या थांबविल्या होत्या. जिल्हा परिषदेत चार दिवसांपासून शिक्षक बदल्यांची प्रक्रिया सुरू होती, ही प्रक्रिया संपताच पवित्र पोर्टलमधून आलेल्या 274 शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. या शिक्षकांना रात्री उाशिरापर्यंत पदस्थापना देण्याचे काम सुऊ होते.

Advertisement

दरम्यान शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकारी धोडामिसे, उपमुख्य कार्यकारी आ†धकारी काळे आणि शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांनी जिल्ह्याचा शैक्षणिक रोड मॅप तयार असून तो समजून घ्यावा. जिल्हा परिषदेचा नावलौकीक आहे, त्याला बाधा येणार नसल्याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.

पहिल्या दिवशीच हजर होण्याचे आदेश
उन्हाळी सुट्टीनंतर जिल्हा परिषदेच्या शाळा शनिवारपासून (15) जूनपासून सुऊ होत आहेत. पवित्र पोर्टलमधील शिक्षकांना शाळा देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. त्यानंतर शाळेच्या पहिल्या दिवशी पवित्र पोर्टलमधील शिक्षकांना हजर होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडामिसे यांनी दिले.

Advertisement
Tags :
Pavitra Portal finally appointedsangli news
Next Article