For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळुरात बेकायदा वास्तव्यास असलेले 272 बांगलादेशी हद्दपार

06:22 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
बेंगळुरात बेकायदा वास्तव्यास असलेले 272 बांगलादेशी हद्दपार
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

देशातील कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने कर्नाटक पोलीस खाते आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई कर बांगलादेशी घुसखोरांचा शोध जारी केला आहे. बेंगळूरमधील विविध भागांत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या 272 बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी परत पाठविण्यात आले आहे. देशातील इतर शहरांच्या तुलनेत ही सर्वात मोठी हद्दपार प्रक्रिया आहे.

गेल्या काही महिन्यांपासून बेंगळुरातील आयटी हब, बांधकाम क्षेत्र आणि कचरा विल्हेवाट युनिटच्या परिसरात विदेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे केंद्रीय गुन्हे शाखेचे (सीसीबी) आणि स्थानिक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. या कारवाईत 178 पुरुष, 194 महिला आणि 12 मुलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची ओळख पटवून त्यांना हद्दपार केले आहे. शिवाय सीसीबी पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात आणणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

Advertisement

सीसीबी पोलिसांनी संपूर्ण बेंगळूर शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली आहे. सध्या ओळख पटविण्यात आलेल्या या नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात आले आहे. उर्वरितांचा शोध जारी आहे. त्यांना बीएसएफमार्फत त्रिपुराच्या हद्दीतून बांगलादेशात पाठविले जात आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा बांगलादेशी नागरिकांना त्रिपुरा सीमेवरून हद्दपार केले जात आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गसूचीनुसार त्यांना कडेकोड पोलीस बंदोबस्तात हद्दपार करावयाच्या ठिकाणापर्यंत नेण्यात येते

Advertisement
Tags :

.