सर्व्होटेक पॉवरकडून 271 टक्के परतावा
वर्षभरातील परताव्याची नोंद : बीपीसीएलकडून 120 कोटींची ऑर्डर
नवी दिल्ली :
मंगळवारी शेअर बाजारातील नकारात्मक स्थितीच्या काळातही सर्व्होटेक पॉवर सिस्टम्सचे समभाग हे 4.93 टक्क्यांनी वाढले होते. 86.25 रुपयांच्या पातळीवर समभाग राहिले. मागील 5 दिवसात, सर्व्होटेक पॉवरच्या समभागाने गुंतवणूकदारांना 6 टक्के परतावा दिला आहे तर गेल्या 1 महिन्यात 11.3 टक्के परतावा दिला आहे. सर्व्होटेक पॉवरच्या समभागांनी गेल्या 1 वर्षात 23.27 रुपयांच्या पातळीवरून गुंतवणूकदारांना 271 टक्के बंपर परतावा प्राप्त करुन दिला आहे.
सर्व्होटेक पॉवर सिस्टम्सच्या समभागांनी 52 आठवड्यांची उच्च पातळी गाठली आहे. सुमारे 1870 कोटी रुपयांच्या बाजारमूल्यासह सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स मजबूत राहिली कारण त्यांना भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 120 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.
देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत पेट्रोलियम ही गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पात 60 किलोवॅट आणि 120 किलोवॅटचे दोन चार्जर व्हेरियंट बसवले जाणार आहेत. कंपनी 2024 च्या अखेरीस हा प्रकल्प पूर्ण करेल. यापूर्वी, सर्व्होटेक पॉवर सिस्टमने देशभरात 4000 ईव्ही चार्जरचा पुरवठा केला आहे.