For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यूपीआय देवाणघेवाणीत सहामाहीत 27 टक्के वाढ

06:37 AM Oct 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
यूपीआय देवाणघेवाणीत सहामाहीत 27 टक्के वाढ
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

Advertisement

यूपीआयमार्फत होणाऱ्या देवाणघेवाणीचा विचार करता चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत अर्थात एप्रिल-सप्टेंबर 2026 अवधीत 27 टक्के इतकी देवाणघेवाणीत वाढ झाली आहे. व्यवहाराची संख्या 145 अब्जपर्यंत पोहचली आहे. मागच्या वर्षी याच अवधीत व्यवहारांची संख्या 114 अब्ज इतकी होती. एनपीसीआय या संस्थेच्या माहितीनुसार एप्रिल ते सप्टेंबर अवधीत 177 लाख कोटी रुपयांचे देवाणघेवाण व्यवहार झाले आहेत. मागच्या वर्षी याच अवधीत पाहता 148 लाख कोटी रुपयांचे यूपीआयमार्फत व्यवहार झाले होते. म्हणजेच व्यवहार मूल्यात 20 टक्के इतकी वाढ झाली आहे.

सप्टेंबरमधील व्यवहार

Advertisement

दुसरीकडे सप्टेंबरचा विचार केल्यास मासिक आधारावर यूपीआय व्यवहारांची संख्या 1 टक्का घटत राहिली होती. ऑगस्टमध्ये यूपीआयमार्फत 2450 कोटी देवाणघेवाणीचे व्यवहार झाले होते. सप्टेंबरमध्ये यूपीआय व्यवहाराचे मूल्य 1.50 टक्का घसरत 29.37 लाख कोटी रुपये इतके होते. ऑगस्टमध्ये हे मूल्य 29.82 लाख कोटी रुपयांचे होते. घसरणीमागे कारण ऑगस्टमध्ये 31 दिवस तर सप्टेंबरमध्ये 30 दिवस सांगितले जात आहे. सप्टेंबरमध्ये प्रतिदिन सरासरी व्यवहार 80.2 कोटी इतके होते. ऑगस्टमध्ये हेच व्यवहार 79.1 कोटी इतके होते. एमडीआर शुल्क लागू होण्याच्या बातमीने व्यापाऱ्यांमध्ये चिंता वाढली होती. कारण त्यांच्यावर हे शुल्क लादले जाणार आहे. याचाच परिणाम म्हणून सप्टेंबरमध्ये व्यवहार थंडावले का असा प्रश्न साहजिकच.

एमडीआर शुल्क मागे घेणार?

सरकारने 15 ऑक्टोबर 2026 पासून व्यापाऱ्यांसाठी 2 हजार रुपयांवरील यूपीआय व्यवहारांवर 0.4 टक्के एमडीआर शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. छोट्या व्यवहारांवर हे शूल्क नसेल. दोन व्यक्तिंमध्ये देवाणघेवाण मोफत राहणार आहे. मग ती कितीही रक्कम असेल. यूपीआय क्युआर कोडच्या मार्फत महिन्याला 1 लाखापर्यंतचे पेमेंट स्वीकारणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना कोणतेही शुल्क नसेल. याचदरम्यान एमडीआरबाबत व्यापाऱ्यांनी सरकारकडे मागे घेण्याची मागणी केल्याचे समजते. यासंदर्भात दबाव वाढल्यास सदरचे शुल्क रद्दही होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

नेमके किती शुल्क

75 हजार रुपये व त्यावरील व्यवहारासाठी एमडीआर जास्तीत जास्त प्रति व्यवहार 300 रुपये इतके असेल. रेल्वे, टेलिकॉम, विमा, इंधन व कृषी खर्चासहीत आवश्यक क्षेत्रांकरीता 2 हजार रुपयांपेक्षा अधिक व्यवहारावर प्रति व्यवहार एकसमान 5 रुपये शुल्क असेल. म्युच्युअल फंड, सिक्योरिटीज व शेअर ब्रोकर व डिलरमार्फत होणाऱ्या पेमेंटवर 0.02 टक्के एमडीआय शुल्क असेल जे जास्तीत जास्त 300 रुपये असेल.

Advertisement
Tags :

.