For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेर्ली,तामगांव, उजळाईवाडी पर्यायी रस्त्यासाठी 27 कोटींचा निधी

08:03 PM Dec 07, 2023 IST | Kalyani Amanagi
नेर्ली तामगांव  उजळाईवाडी पर्यायी रस्त्यासाठी 27 कोटींचा निधी
Advertisement

आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये निधीला मंजूरी

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील विकासवाडी नेर्ली तामगांव -उजळाईवाडी (बाह्य वळण) पर्यायी रस्ता मार्गासाठी 27 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. याबाबत आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये या निधीला मंजुरी मिळाली आहे. यातील 1 कोटी 9 लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Advertisement

कोल्हापूर जिह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ते ऊजळाईवाडी- नेर्ली- तामगांव- हलसवडे प्रजिमा क्र. 94 या मार्गावरुन कोल्हापूर शहरात येणाऱ्या वाहतुकीबरोबरच हुपरी, गोकुळ शिरगांव एमआयडीसीमधूननही वाहतूक मोठ्या प्रामाणात होत असते. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामुळे प्रजिमा 94 या मार्गाचा काही भू-भाग भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात गेल्याने संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे नेर्ली- तामगांव - हलसवडे- सांगवडे - हुपरी औद्योगिक वसाहतीकडील उद्योजक व नागरिकांना कोल्हापूर शहराकडे व राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 कडे येणारा मार्ग बंद झाल्याने संपर्क तुटला आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करुन सदर रस्त्याला पर्यायी मार्ग (बाह्य वळण) करण्याची मागणी आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांनी केली होती.

गुरुवारपासून सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या पुरवणी मागणीमध्ये करवीर तालुक्यातील विकासवाडी नेर्ली तामगांव उजळाईवाडी विमानतळमार्गे मुडशिंगी वसगडे लांबोरे मळा ते रा.मा. क्र. 177 ला मिळणारा रस्ता प्र.जि. मा. क्र. 94 या मार्गासाठी भूसंपादन व रस्ता तयार करणेसाठी 27 कोटी रुपयांच्या निधी मंजूर झाला असून या कामासाठी 1 कोटी 9 लाखाची तरतुदही करण्यात आली आहे. नेर्ली तामगाव उजळाईवाडी पर्याय मार्गसाठी निधी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार सतेज पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले.

Advertisement
Tags :

.