महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नव्या टर्मिनलसाठी 265 कोटींच्या निविदा

10:11 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सांबरा विमानतळाचे आधुनिकीकरण : पंचतारांकित सुविधांचा असणार समावेश

Advertisement

बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनलसाठी 265 कोटींच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. यामध्ये 216 कोटी रुपयांचे बांधकाम व इतर 49 कोटी रुपये देखभाल व दुरुस्तीसाठी ठेवण्यात आले आहेत. यामुळे बेळगावला एक सुसज्ज आणि सर्व सेवांनीयुक्त टर्मिनल मिळणार आहे. बेळगाव विमानतळाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवासी संख्येसोबतच कार्गो वाहतूकही वाढू लागली आहे. विमानांची ये-जा वाढल्याने पार्किंगसाठी अजून जागा आवश्यक आहे. तसेच सध्या असणारे टर्मिनल प्रवाशांसाठी अपुरे पडत असल्याने नवे टर्मिनल बांधले जाणार आहे. काही महिन्यांपूर्वी नव्या टर्मिनल बांधकामासाठी केंद्र सरकारच्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून परवानगी देण्यात आली. तसेच विमानतळाच्या अतिरिक्त जागेसाठीही जिल्हा प्रशासनाकडून हालचाली गतिमान आहेत. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अंदाजे 265 कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. टर्मिनलच्या बांधकामासाठी 24 महिने अथवा 730 दिवस कंत्राटदाराला दिले जाणार आहेत. तसेच देखभालीसाठी पुढील पाच वर्षे दिली जाणार आहेत. निविदा भरण्याच्या प्रक्रियेला 27 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला असून 12 डिसेंबर अंतिम तारीख आहे.

Advertisement

ग्राहकांना पंचतारांकित सेवा 

नव्या टर्मिनलमध्ये पंचतारांकित सेवा ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. टर्मिनलमध्ये चार एअरो ब्रिज उभारले जाणार आहेत. एकाच वेळी 2400 प्रवासी ये-जा करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात होणारी विमान प्रवाशांची गर्दी आटोक्यात आणता येईल. यामध्ये पार्किंग, सर्व्हिस रोड, हायवेपासून अॅप्रोच रोड यासह इतर सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

एकाच वेळी 500 वाहनांचे पार्किंग

तळमजल्यावर चेक इन हॉल, पॅसेंजर्स स्क्रिनिंग व सुरक्षेच्या बाबीतील इतर गोष्टी केल्या जाणार आहेत. एकाच वेळी 500 वाहनांचे पार्किंग केले जाईल, अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर बस व इतर खासगी वाहनांना पार्किंग उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्मिनल बेळगावमध्ये लवकरच उभारले जाणार आहे. यामुळे बेळगावच्या विकासाला हातभार लागणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article