For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदुस्थान युनिलिव्हरला 2610 कोटी रुपयांचा नफा

06:46 AM Jul 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंदुस्थान युनिलिव्हरला 2610 कोटी रुपयांचा नफा
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड यांनी आपला जूनअखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने तिमाहीत 2610 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. याचदरम्यान बुधवारी शेअरबाजारात कंपनीचे समभाग 3 टक्के इतके घसरणीत राहिले होते.

मंगळवारी उशीरा कंपनीने आपल्या तिमाहीचा निकाल घोषित केला होता. त्यानंतर त्याचे पडसाद बुधवारी शेअरबाजारात समभागावर उमटणं साहजिक होतं. कंपनीने एप्रिल-जून तिमाहीत 2610 कोटी रुपयांचा नफा कमावला असून मागच्या वर्षी समान तिमाहीच्या तुलनेत नफा 2.2 टक्के इतका अधिक दिसून आला आहे. कंपनीच्या विविध वस्तुंच्या विक्रीमध्ये 4 टक्के इतकी वाढ दिसून आली आहे.

Advertisement

उत्पन्नात वाढ

याचदरम्यान जूनच्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात 1.4 टक्के वाढ झाली असून कंपनीने 15,707 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे. लक्स साबण बनवणाऱ्या या कंपनीने अलीकडेच आपल्या उच्च श्रेणीतील उत्पादनांच्या किमती कमी केल्याचे समजते यातून ग्राहकांना फायदा मिळवून देण्याचा विचार कंपनीचा होता. ब्लुमर्ग यांनी कंपनी 2601 कोटी व 16,586 कोटी रुपये अनुक्रमे नफा, उत्पन्न मिळवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता, जो खरा ठरला आहे.

काय म्हणाले एमडी

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रोहित जावा म्हणाले की, कंपनी वेगाने मागणी असणाऱ्या उत्पादनांवर आपले लक्ष्य पेंद्रीत करत आहे. गावांमध्ये स्थितीत सुधारणा होत असून आगामी काळ कंपनीसाठी चांगला असणार आहे. किमतीत सुधारणा करतानाच खर्चावर मर्यादा आणत नफ्यात वाढ करण्याच्या ध्येयासाठी कंपनी झटते आहे.

Advertisement
Tags :

.