2600 वर्षे जुना रहस्यमय खजिना लागला हाती
जगाचा इतिहास खूपच प्राचीन आहे. यातील काही शतकांपर्यंतचा इतिहास माणसाला ज्ञात आहे. परंतु सर्वकाही ज्ञात नाही कारण त्यापूर्वीच्या घडामोडींचा लेखी इतिहास उपलब नाही. याचमुळे वेळोवेळी अशी रहस्यं समोर येत असतात, जी थक्क करत असतात. असाच एक कालौघात हरवून गेलेला खजिना इजिप्तच्या वैज्ञानिकांच्या हाती लागला आहे.
वैज्ञानिकांच्या टीमने इजिप्तच्या कर्णाक मंदिराच्या परिसरात हा खजिना शोधला आहे. हे ठिकाण थेबेसच्या प्राचीन शहरात असून ज्या मंदिर परिसरात तो आहे ते सुमारे 4 हजार वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आले होते. काळासाब्sात याचा विस्तार झाला आणि यात अनेकदा बदल करण्यात आले. यादरम्यान कुणाची नजर या खजिन्यावर पडली नव्हती.
मंदिर परिसरात मिळाला खजिना
पुरातत्व तज्ञांनुसार तेथे सोन्याने भरलेले एक पात्र सापडले असून यात अमूल्य गोष्टी आहेत. यात सोन्याचे चमकणारे दागिने आणि एक अत्यंत दुर्लभ मूर्ती देखील आहे. ही एखाद्या देवतेच्या परिवाराची मूर्ती असल्याचे मानले जात आहे. इजिप्तचे पर्यटनमंत्री अब्देलगाफ्फर वागदी यांनी कर्णाक मंदिराच्या उत्तर-पश्चिम हिस्स्यात या मूर्ती मिळाल्याची माहिती दिली आहे.
कुठून आला हा खजिना?
मंदिराचा हा हिस्सा बहुधा नागरी वस्तीचा राहिला असावा. या मूर्ती इजिप्तचे प्राचीन देवता अमुन, खोंसु आणि मत यांची असल्याचे मानले जात आहे. येथे सापडलेले दागिने दफन करण्यासाठीच निर्माण करण्यात आले असावेत असा निष्कर्ष आभूषण इतिहासकार जॅक ऑग्डेन यांनी काढला आहे. हे दागिने पात्रात का ठेवण्यात आले हे कळू शकलेले नाही. बहुधा खराब होण्यापासून किंवा तुटण्यापसून वाचविण्यासाठी हे केले गेले असावे असे इतिहासकारांचे मानणे आहे.