For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘सुखोई’च्या इंजिन्ससाठी 26 हजार कोटींचा करार

06:14 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘सुखोई’च्या इंजिन्ससाठी 26 हजार कोटींचा करार
Advertisement

एचएएलसोबत संरक्षण मंत्रालयाचा करार : आत्मनिर्भरतेला मिळणार बळ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशाच्या संरक्षणात्मक शक्तीला सातत्याने मजबुती मिळत आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात सराकर आता आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देत आहे. याचनुसार हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडसोबत (एचएएल) सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमानांसाठी 240 एएल-31 एफपी एअरो इंजिन्स खरेदीवरून करार करण्यात आला आहे. या कराराचे मूल्य 26 हजार कोटी रुपये इतके आहे. संरक्षण मंत्रालय आणि एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी या करारावर स्वाक्षरी केली असून यावेळी संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि वायुदल प्रमुख व्ही. आर. चौधरी उपस्थित होते.

Advertisement

या एअरो इंजिन्सची निर्मिती एचएएलच्या कोरापूट डिव्हिजनकडून केली जाणार आहे. यामुळे सुखोई-30 विमानांच्या ताफ्याची संचालन क्षमता कायम ठेवण्यासाठी वायुदलाच्या गरजा पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. करारानुसार एचएएल दरवर्षी 30 एअरो-इंजिन्सचा पुरवठा करणार आहे. अशाप्रकारे सर्व 240 इंजिन्सचा पुरवठा पुढील 8 वर्षांच्या कालावधीत पूर्ण केला जाणार आहे.

स्वदेशी सामग्रीचा अधिकाधिक वापर

या इंजिन्सच्या निर्मितीकरता 50 टक्क्यांपेक्षा अधिक स्वदेशी सामग्री वापरण्यात येणार आहे. एअरो-इंजिनच्या प्रमुख घटकांच्या स्वदेशीकरणामुळे हे शक्य झाले आहे. या इंजिन्सची निर्मिती एचएएलच्या कोरापूट विभागात केली जाणार आहे. एसयू-30 मार्क 1 भारतीय वायुदलातील सर्वात शक्तिशाली आणि रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण लढाऊ विमान आहे. एचएएलकडून या एअरो इंजिन्सचा पुरवठा भारतीय वायुदलाच्या ताफ्याच्या देखभालीची आवश्यकता पूर्ण करणार आहे. यामुळे वायुदलाला सुखोई विमानांचे संचालन विनासमस्या जारी ठेवता येणार आहे.

Advertisement

.