For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्मार्टफोन विक्रीत 26 टक्क्यांची घट

06:15 AM Oct 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्मार्टफोन विक्रीत 26 टक्क्यांची घट
Advertisement

भारतात सण असूनही विक्रीत घसरण : 3.58 कोटी फोनची विक्री : मागील 10 वर्षात नीचांकी नोंद

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सणासुदीचा कालावधी असूनही, भारतात मागील 3 महिन्यांत नवीन स्मार्टफोनच्या विक्रीत 26 टक्के इतकी घट झाली आहे. ‘ओम्डिया’ या बाजार संशोधन संस्थेनुसार, जुलै ते सप्टेंबर दरम्यान देशभरात एकूण 3.58 कोटी फोन विकले गेले.

Advertisement

वर्ष 2016 नंतर गेल्या 10 वर्षांतील कोणत्याही तिमाहीतील ही सर्वात कमी विक्री आहे. स्मार्टफोनच्या सतत वाढणाऱ्या किमती आणि लोकांकडून जुने फोन दीर्घकाळ वापरणे ही यामागील सर्वात मोठी कारणे मानली जात आहेत.

सॅमसंगने सर्वाधिक फोन विकले, अॅपल पाचव्या स्थानी सॅमसंगने 2026 च्या तिसऱ्या तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) 67 लाख फोन विकून पुन्हा एकदा देशात अव्वल स्थान पटकावले आहे. अडीच वर्षांनंतर (2024 ची पहिली तिमाही), सॅमसंग पुन्हा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामागे गॅलेक्सी ए07, ए17 आणि ए27 सारख्या स्वस्त फोन्सना आणि प्रीमियम स्मार्टफोन्सना असलेली चांगली मागणी हे कारण होते. याशिवाय, सुलभ हप्ते आणि एक्सचेंज ऑफर्सचाही फायदा झाला.

चीनी कंपन्या विवो, ओप्पो आणि शाओमीच्या विक्रीत घट विवो: 64 लाख फोन विकून दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. परंतु वारंवार होणारी दरवाढ आणि स्वस्त फोन्समुळे विक्रीत 34टक्के घट झाली.

ओप्पो: 49 लाख फोन विक्रीसह तिसऱ्या क्रमांकावर, वार्षिक तुलनेत 24 टक्के घट.

शाओमी: 4.7 दशलक्ष फोन विकले आणि चौथ्या क्रमांकावर कायम, विक्रीत 28टक्के घट झाली. महागडे पार्ट्स, मॉडेल्स आणि किमती बदलाव्या लागल्यामुळे मागणी कमी झाली.

आयफोन 17, 16 सर्वाधिक मागणीत

अॅपल 39 लाख फोन विकून पाचव्या क्रमांकावर होती. दरवाढीच्या अपेक्षेने दुकानदारांनी आगाऊ साठा ठेवल्यामुळे आणि आयफोन 17 व 16 मॉडेल्सच्या मागणीमुळे विक्री वाढली. त्याच वेळी, नवीन आयफोन 18

प्रो आणि 18 प्रो मॅक्सच्या लाँचमुळे विक्री वाढण्यास मदत झाली.

चीनी कंपन्यांचा दबदबा घटला

याचदरम्यान चिनी कंपन्यांचा बाजारहिस्सा 75 टक्के वरून 68टक्केपर्यंत घसरला होता. ओम्डियाच्या अहवालानुसार, भारतातील चिनी कंपन्यांचे वर्चस्व कमी झाले आहे. एका वर्षापूर्वी चिनी ब्रँड्सचा बाजार हिस्सा 75टक्के होता, तो यावेळी 68 टक्केपर्यंत घसरला आहे. दुसरीकडे, सॅमसंग आणि अॅपलने त्यांच्या महागड्या-प्रीमियम फोन्स, स्टोअर्सचे मजबूत जाळे आणि सुलभ ईएमआय व एक्सचेंज ऑफर्समुळे बाजारात आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे.

Advertisement

.