कलंबिस्त येथील २५० कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश
सावंतवाडी । वार्ताहर
कलंबिस्त पंचक्रोशी सैनिकी परंपरा लाभलेला भाग आहे .कुठल्याही पक्षात गेल्यानंतर एकनिष्ठेने काम करणे हे या पंचक्रोशीचे वैशिष्ट्य आहे. या भागाचा विकास करण्याची जबाबदारी आपली आहे. या भागातील रस्ते, माजी सैनिक भवन,शेतकऱ्यांचे प्रश्न असे सर्वच प्रश्न निश्चितपणे सोडवले जातील. अतिवृष्टीमुळे झालेली भात पिकाची नुकसान भरपाई सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्याची व्यवस्था आणि शासन निर्णय काढण्यात आला आहे.असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी मेळाव्यात स्पष्ट केले. कलंबिस्त राईवाडी येथे घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांसह सुमारे अडीचशे कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत आमदार दीपक केसरकर व जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा विभाग प्रमुख दिनेश सावंत आणि असंख्य युवा कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या मेळाव्यात आमदार दीपक केसरकर ,शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब,प्रेमानंद देसाई,पंढरी राऊळ ,दिनेश गावडे,गणपत राणे, जीवन लाड ,रमाकांत सावंत,संजय पालकर,ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव सुप्रिया राऊळ,दिनेश सावंत, प्रकाश सावंत ,सिताराम गावडे,अनिल सावंत ,रमेश सावंत ,गजानन सावंत, शाहू पास्ते, अजय गोंदावळे,बंटी पुरोहित ,अर्पित पोकळे,विनोद सावंत ,परीक्षित मांजरेकर ,माजी सैनिक कॅप्टन अरुण सावंत ,संतोष नार्वेकर ,माजी सैनिक अनंत सावंत, स्नेहल लाड,संजय सावंत आधी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी श्री केसरकर म्हणाले ,तुमच्या भागाचा सर्वांगीण विकास केला जाईल . येत्या काळात पर्यटन दृष्ट्या या भागाला मोठा वाव आहे. कोल्हापूर ,गोवा जोडणारा रस्ता दृष्टीक्षेपात आहे तसेच शिवापूर रस्ताही मंजूर करण्यात आला आहे. शिरशिंगे धरणाला 650 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत . त्यामुळे हा भाग सुजलाम सुफलाम होईल. कलंबिस्त सातेरी मंदिराकडे जाणारा रस्ता अशी सर्व कामे करण्याचे आपण तुम्हाला वचन देतो . तुम्ही पक्षात प्रवेश केला तुमचे स्वागत आहे.. मायनिंग फंडातून सैनिकी गावांना माजी सैनिक भवन आधी कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील 9 जिल्हा परिषदवर शिवसेनेचा झेंडा...
जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले तुम्ही सर्वजण आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केला आहेत . निश्चितपणे तुमची सर्व कामे केली जातील. या भागात एकही विकास काम राहणार नाही याची जबाबदारी आपलीआहे . तुम्ही कुठलेही काम घेऊन या. ज्या भागात आपल्या हक्काचा आमदार असतो तेथेच विकास कामे होतात बाकी कोणीही येऊन तुम्हाला सांगेल की , आम्ही विकास करतो पण तसं कधी होणार नाही . त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा 9 जिल्हा परिषद वर शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले. या भागात जिल्हा परिषद ओबीसी महिला व पंचायत समिती महिला व पुरुषसाठी आरक्षित आहे . आता तेच तेच उमेदवार नको. आपल्याला बदल करायला हवा आणि तुम्हाला निश्चितपणे चांगले उमेदवार या भागात नेतृत्व करण्यासाठी मिळतील असे ते म्हणाले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव ,सुप्रिया राऊळ, युवा विभाग प्रमुख दिनेश सावंत,कुसाजी सावंत ,प्रकाश सावंत. ,श्री श्याम राऊळ,रामा राऊळ आधी अडीचशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सूत्रसंचालन रघुनाथ सावंत यांनी केले.