सावंतवाडी न्यायालयात २५० प्रकरणे सामंजस्य आणि तडजोडीने निकाली
राष्ट्रीय लोक अदालत संपन्न
सावंतवाडी -
सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती व सावंतवाडी तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील न्यायालयात शनिवारी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकअदालत मध्ये ठेवण्यात आलेल्या दिवाणी न्यायालय सावंतवाडी यांचेकडील प्रलंबित व वादपूर्व दोन्ही मिळून 1682 प्रकरणे ठेवलेली होती. त्यातील एकूण 250 प्रकरणे निकाली काढण्यात येऊन त्यातून 27 लाख 3 हजार,299 रुपये रक्कम वसुली झाली.यापैकी पोलिस ई-चलन ,रोख रक्कम व ऑनलाईन युपीआय द्वारे 11 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून रक्कम 7 हजार 950 रुपये वसुली झाली. सावंतवाडी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश मा. सौ. जे. एम. मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली हे लोक राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय सावंतवाडी येथे 13 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये प्रलंबित दिवाणी व फौजदारी 358 ठेवली होती. त्यापैकी 60 प्रकरणे निकाली झाली असून रक्कम रुपये 19 लाख 90 हजार 821 एवढी रक्कम वसुली झाली आहे.वादपूर्व प्रकरणे एकूण 1324 ठेवण्यात आली होती. त्यातील 179 प्रकरणे निकाली होऊन त्यातून रुपये 7 लाख12 हजार 478 एवढी रक्कम वसुली झाली.लोकअदालतीचा शुभारंभ सावंतवाडी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश सावंतवाडी सौ. जे. एम. मिस्त्री यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी सहदिवाणी न्यायाधीश सौ.आर.जी. कुंभार, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड बी. बी. रणशूर, सरकारी सहाय्यक अभियंता गणेश पाटोळे, सौ. स्वाती पाटील व तसेच पॅनल सदस्य म्हणून ॲड अभिषेक आर. चव्हाण तसेच न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार आदी उपस्थित होते. लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व बॅंकानी तसेच स्टेट बॅकऑफ इंडिया सावंतवाडी, बॅंक ऑफ इंडिया सावंतवाडी व बांदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र आजगांव यांचे विशेष योगदान व परिश्रम लाभले आहेत. पंचायत समिती सावंतवाडी अंतर्गत सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायती,वीज वितरण कंपनी सावंतवाडी, दूरसंचार निगम सावंतवाडी यांचे सर्व अधिकारी वर्ग तसेच पोलिस ई-चलन चे जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्ग या सर्वांनी मोलाचे योगदान , सहकार्य व परिश्रम घेतले आहेत. दिवाणी न्यायालय तथा तालुका लिगल ॲड समिती सावंतवाडी कार्यालयाचे कर्मचारी सौ.आर्या अडुळकर वरिष्ठ लिपिक, श्री. आतिश छजलाने व श्री शुभम शिंदे कनिष्ठ लिपिक ,श्री. अभय चव्हाण, चपराशी यांचे सहकार्य कार्यक्रमास होते.तसेच लोक अदालत यशस्वी होण्यासाठी दिवाणी न्यायालय कार्यालयाचे सहाय्यक अधीक्षक सौ.वहिदा मीर, स्टेनो सौ. वैष्णवी देसाई, वरीष्ठ लिपीक श्री. दिवाकर सावंत, सौ नाडकर्णी , कनिष्ठ लिपिक सौ. रावराणे, सौ शिंदे, सौ. कदम , चपराशी श्री अभिजित चौकेकर, श्री. तानाजी कोळेकर हया सर्वांनी सहकार्य व परिश्रम घेतले आहेत.