कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जगभरात 25 टक्के मुले किडनी विकारग्रस्त

10:58 AM Mar 14, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

लहानांमध्ये वाढते किडनीचे विकार चिंताजतक बाब बनत चालली आहे. जागतिक सर्व्हेच्या एका आकडेवाडीनेसार प्रौढांच्या तुलनेत 25 टक्के लहान मुलांना किडनीचे आजार होत आहेत. लहान मुलांमध्ये जन्मजात व्यंग, अनुवंशिकता, उच्च रक्तदाब, शरीरातील असंतुलन आम्लक्षार, प्रतिकार शक्ती कमी असणे, पोषणाची कमतरता, मुत्रमार्गातील जंतू संसर्ग आदी कारणांमुळे किडणी विकाराचे प्रमाण वाडत असल्याचे किडनी विकार तज्ञ सांगतात. यामध्ये जन्मल्यापासून ते 18 वर्षांच्या मुलांचा समावेश असल्याचे तज्ञांनी सांगितले

Advertisement

लहान मुलांमधील किडनी विकाराचे निदान वेळीच होणे गरजेचे आहे. लहान मुलांना बोलता येत नसल्याने याचे निदान होण्यास उशिर लागतो. यासाठी पालकांनी सजग राहणे गरजचे आहे. मुल बोलू लागले की किडनीच्या आजाराचे निदान होते. तोपर्यंत हा आजार पुढे गेलेला असतो. मुल सर्वसामान्य असले तरी किडनी विकारांमध्ये बुहतांश वेळा आजार पुढच्या पातळीवर जाईपर्यंत कोणतीच लक्षणे दिसून येत नाहीत. यासाठी आधीच तपासण्या करणे गरजेचे असते.

प्रौढांमध्ये सध्याची बदली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, उच्च रक्तदाब, मधुमेह, मद्याचे अतिसेवन आदी कारणांमुळे किडनीचे विकार उद्भवू शकतात. किडनी विकार हा केवळ प्रौढांमध्ये नव्हे तर लहान मुलांमध्ये सुद्धा एक मोठी समस्या बनत आहे. जागतिक पातळीवरील एका सर्व्हेक्षणानुसार 85 कोटी किडनीशी संबंधित आजारातील प्रौढ नागरीकांमधील सुमारे 20 कोटीपर्यंत लहान मुलांनाही किडनी विकाराच्या समस्येने घेरले असल्याचे नमुद केले आहे. दीर्घकालीन किडनी विकाराचे निदान लवकर निदर्शनास आले नाही तर किडनीचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत जाऊन पूर्णत: अकार्यक्षम बनतात.

दोन वर्षाखालील लहान मुलांमध्ये मूत्रमार्गाचे जंतू संसर्गाचे निदान करणे बालरोगतज्ञांसाठी कठीन असते. ताप असलेल्या लहान मुलांमध्ये कोठे जंतुसंसर्ग झाला आहे हे सहजपणे कळत नसेल तर लघवीची नियमित तपासणी केल्याने जंतू संसर्गाचे लवकर निदान होऊन किडनीला होऊ शकणारी इजा आपण टाळू शकतो.

लहान मुलांमध्ये विशेषत: एक ते आठ वर्षांमधील मुलांमध्ये शरीरातील रोगप्रतिकारशक्तीमध्ये तात्कालीक अयोग्य बदल झाल्यामुळे किडनीतील फिल्ट्रची छिद्रांचा आकार वाढून शरीरातील प्रथिने वाया जातात. अशी प्रथिने वाया गेल्यामुळे विकार उद्भवू शकतात.

तीन ते चार वर्षावरील प्रत्येक मुलाचे बालरोग तज्ञांकडून दरवर्षी एकदा तरी रक्तदाब तपासून घेणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाबाचे लवकर निदान झाले तर लहान मुलांच्या डोळे, किडनी या अवयवांवर अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकणारे दुष्परिणाम आपण टाळू शकतो.

- शरीरातील नत्रयुक्त पदार्थ शरीराबाहेर मुत्रमार्गाने उत्सर्जित करणे

- शरीरातील आम्लपित्त तसेच क्षारांचे संतुलन करणे

- शरीरातील रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे

- रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण नियंत्रित करणे

- शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित करणे.

- शरीरात तयार झालेल्या जीवनसत्व डी च्या सहायाने कॅल्शियम, फॉस्फरस या धातूचे संतुलन साधून हाडे, दात, स्मायू मजबूत करणे.

- जन्मजात किडनी व मुत्रमार्गाचे व्यंग

- मूत्र मार्गाचा जंतुसंसर्ग

- लघवी लाल होणे

- लघवीतून प्रथिने वाया जाऊन हाज्प्rदूग्म् sग्ह्दस होणे

- किडणेमधील कार्यामुळे मुडदूस होणे

- लहान मुलांमधील रक्तदाब

- शरीरातील क्षार व आम्लपित्ताचा विकार

- मूत्राशयाच्या पिशवीचे व मूत्रविसर्जनाचे विकार

विविध कारणांमुळे लहान मुलांमध्येही किडनीचे विकार वाढत आहेत. मुलांना कोणतेही लक्षणे दिसताच पालकांनी बालरोग तज्ञांकडून मुत्रविकाराशी आवश्यक त्या सर्व तपासण्या करणे गरजचे आहे. मुलांमधील वेळीच किडनीचे निदान झाल्यास औषधोपचाराने उपचार करून सर्वसामान्य आयुष्य जगता येते. लवकर निदान होऊन किडनीला होऊ शकणारी इजा टाळू शकतो.

                                                                         डॉ. शिशिर मिरगुंडे, अधिष्ठाता, सीपीआर

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article