For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : सांगलीत पार्किसनसवर संशोधनाकरिता 25 लाखांची मदत

04:49 PM Dec 25, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत पार्किसनसवर संशोधनाकरिता 25 लाखांची मदत
Advertisement

                             जागतिक आरोग्य संशोधनात सांगलीचा सहभाग

Advertisement

सांगली : एनएचएस ट्रस्ट इंग्लंड यांना पार्किन्सन्स या दुर्धर आजारावरील संशोधनाकरता सांगलीचे माजी आमदार स्वर्गीय पेलवान संभाजीराव पवार यांच्या स्मरणार्थ २५ लाखाची मदत देण्यात आली. संभाजी आप्पांचे पुत्र आणि माजी नगरसेवक गौतम पवार यांनी मदतीचा धनादेश संबंधित संस्थेकडे नुकताच सुपूर्द केला. या मदतीनंतर प्रभावित होऊन जगभरातील अनेक उद्योजक, राजकीय व्यक्ती यांनी मोठ्या प्रमाणात या संशोधनाकरिता योगदान दिले.

पार्किनसनचे रुग्ण व रुग्णांचे परिवार सदस्यांना होणारे अनेक समस्यावर यासंशोधनातून फायदा होणार आहे. या संशोधन उपक्रमात गौतम पवार यांनी मदत व सहभाग घेतला. या उपक्रमामुळे रुग्णांची संपूर्ण लक्षणे नोंद ठेवून दर्जेदार निदान व अहवाल वैद्यकीय तज्ञांना प्राप्त होतो व त्या अहवालावर आधारित रुग्णांना जगभरातून कुठेही बसून दुसऱ्या ठिकाणी उपचार करीता मार्गदर्शन करता येणेशक्य झाले आहे.

Advertisement

या उपकरणांचेमुळे एपिलेपसी मधे फिट येणेपूर्वी १०-१५ मिनिट आधीच रुग्णांना सावधानतेचा इशारा मिळतो तसेच परिवारक सदस्यांना नोटिफिकेशन रूग्णाच्या लोकेशन सह प्राप्त होते. अशा आधुनिक आरोग्यसुविधांचे व संशोधनाचे कार्य व परिणामकारिकता "ओं क्सफर्ड विद्यापीठ येथे ब्रिटनचे संसद सदस्य . ऑक्सफर्डचे महापौर, बहत महानगरपालिकेचे महापौर व जगभरातील ३० देशांचे २८५ प्रतिनिधीसमोर ७ मिनिट माहीती सादर करणेकरिता गौतम पवार यांना आमंत्रित करणेत आले होते.

एनएचएस ट्रस्ट, किंग्ज कालेज लंडन चे डॉ. विनोद मेट्टा, प्रो. रे यांचेसह विविध सहकारी यांचे टिम सोबत संशोधन कार्यतील सहभाग आहे. ए.आय. उपकरणांचे संशोधनातील समावेश व आरोग्य क्षेत्रातील क्रांती या विषयावर पवार यांनी विचार मांडले. यावेळी ऑक्सफर्डमधील जगप्रसिद्ध किबल्स कॉलेज तर्फे उत्कृष्ट उद्योजक (आरोग्य सुविधा) असा पुरस्कार देऊन पवार यांचा सन्मान करण्यात आला. ब्रिटिश संसद सदस्य व महापौरांच्या उपस्थितीत माहिती सादर करण्याचा आनंद मिळाला. असे पवार यांनी सांगितले. यावेळी द्वारका गौतम पवार हिने तेथे पियानो वर राष्ट्रगीत सादर केले, याचाही आपल्याला विशेष आनंद झाला, असे पवार यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.