महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

25 लाखाचे मोबाईल चोरट्यांकडून जप्त

12:05 PM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन टोळ्यांतील 20 जणांना अटक : कळंगुट पोलिसांनी केली कारवाई

Advertisement

पणजी : राज्यात गेले तीन दिवस झालेल्या सनबर्न महोत्सवात खास मोबाईल चोरी करण्यासाठी तीन टोळ्dया गोव्यात आल्या होत्या. कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्यातील 20 जणांना काल सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 25 लाख ऊपये किमंतीचे 60 मोबाईल जप्त केले आहेत, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व राजस्थान या भागातील या तिन्ही टोळ्dया असून महोत्सवात खास मोबाईल चोरण्यासाठीच आल्या होत्या, असे वाल्सन म्हणाले. पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत निधीन वाल्सन बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत पर्वरी उपविभागीय अधिकारी विश्वेश कर्पे, कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक परेश नाईक उपस्थित होते. वाल्सन यांनी कळंगुट पोलिसांचे अभिनंदन करताना त्यांनी ही मोठी आणि चांगली कामगिरी बजावल्याचेही म्हटले. संशयित कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले आणि त्यांची विचारपूस केली असता ते त्यांच्या परिसरात असण्याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत तसेच त्यांच्याजवळ सापडलेले मोबाईल फोन्स बाबतही समर्पक माहिती देऊ शकले नाहीत. त्यांच्या ताब्यात विविध ब्रँडचे एकूण 60 मोबाईल फोन सापडले आहेत. याशिवाय अनेक चोरी, स्नॅचिंग, पर्यटकांविऊद्ध मारहाणीचे गुन्हे कळंगुट पोलीस स्थानकात नोंदविलेले आहेत.  त्याबाबतही संशयित व्यक्तींची अधिक चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोनची पडताळणी करण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

तीन टोळ्या होत्या कार्यरत

तिन्ही टोळ्dया जवळपास 25 डिसेंबरपासून गोव्यात कार्यरत आहेत. उत्तर गोव्यातील कळंगुट, हणजूण, साळगांव पोलीस स्थानकातून नाताळाच्या काळात तब्बल 37 संशयितांना अटक करण्यात आली तर दीड कोटी ऊपये किमंतीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या मोबाईलची पडताळणी करून आणि सर्व सोपस्कर पूर्ण करून मोबाईल मालकाला दिले जात आहेत. किनारी भागातील पोलीस स्थानकात 190 तक्रारी मोबाईल चोरीच्या नोंद झाल्या आहेत. पोलीस त्याबाबत तपास करीत असून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्यांची कसून उलट तपासणी केली जात आहे, असेही वाल्सन यांनी सांगितले.

अटक केलेल्या संशयितांमध्ये बिजन बाबू विश्वास (22, रा. ठाकूरनगर परगणा, पश्चिम बंगाल), अरबाज अस्लम सय्यद (27, सुलतानपूर, अमेठी, उत्तर प्रदेश), सुजय दास (21, नादिया कलकत्ता, गंगणापूर, पश्चिम बंगाल), बाली अर्जुन बंजारा (19, मायबिरजी करवली, राजस्थान), सुभाष सिंग (31, समारा, गो•ा, झारखंड), अब्दुल रहीम (35, मलप्पुरम परप्पांगडी, केरळ), मोहम्मद मोसम (20, त्रिवेंजगन बिहार), लोकेश सुरेश बज्यंत्री (20, गंगाधर नगर, हुबळी, कर्नाटक), विशाल बिजवाडा (22, शांतीनिकेतन कॉलनी, हुबळी, कर्नाटक), नागराज रा. शेखरिया हिरेमठ (26, घोफंगोफ, हुबळी, कर्नाटक), शाबाज रतिक शेख (18, मालेगाव नाशिक, महाराष्ट्र), जावेद अन्वर खान (37, विक्रोळी, मुंबई, महाराष्ट), फैझुल अजिज खान (21, मालेगाव, नाशिक, महाराष्ट), ताहिर खादरसाब कित्तूर (28, मस्तानसोफा, हुबळी, कर्नाटक), रहमत मुख्तार अली (19, कुलाही, बलरामपूर, लखनौ), सय्यद इक्बाल (21, मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र), मो. साद्दिक कानवल्ली (21, खडे बाजार, बेळगाव, कर्नाटक), सुलेमान शमसुद्दीन शेख (26, मालेगाव, नाशिक महाराष्ट्र), शोहेब तालिब शेख (22,  हिरापुरा, मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र), अरबाज खलेली खान (19, मालेगाव, गुऊशेर नगर, महाराष्ट) यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article