महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंधरा मिनिटात लांबविले 25 लाख!

06:55 AM Mar 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शाहूनगरात खिडकीची काच फोडून चोरी, परिसरात खळबळ

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. शनिवारी दुपारी शाहूनगर येथील एका बंद घराच्या खिडकीची काच फोडून पाठीमागचा दरवाजा उघडून 25 लाख रुपये रोकड असलेली बॅग पळविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

उद्योजक मनोहर येळ्ळूरकर यांच्या घरी ही घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. सकाळी 11.45 ते 12.00 या केवळ पंधरा मिनिटांच्या कालावधीत चोरट्याने हे कृत्य केले असून चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे.

घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यु., एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन, पोलीस उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.

मनोहर यांचा मुलगा हरीश येळ्ळूरकर यांनी आपल्या आईला सकाळी 11.45 वाजता घरापासून जवळच असलेल्या दवाखान्याला नेले होते. घराला कुलूप लावण्यात आला होता. केवळ पंधरा मिनिटात ते घरी परतले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने पाठीमागची काच फोडून दरवाजा उघडल्याचे उघडकीस आले असून 25 लाख रुपये रोकड असलेली बॅग पळविण्यात आली आहे.

बँकांना सलग सुटी असल्यामुळे ही रक्कम घरी ठेवण्यात आली होती. मात्र, चोरट्याने केवळ पंधरा मिनिटात पैशाची बॅग पळवून तेथून पलायन केले असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article