कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur Political News: कोल्हापूरातील 3 माजी महापौरांसह 25 नगरसेवक शिंदेच्या शिवसेनेत

11:07 AM Jun 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबईत DCM एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला

Advertisement

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत (शिंदे गट) जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. महापालिकेच्या तीन माजी महापौरांसह माजी स्थायी समिती सभापती आणि गटनेता असे मिळून 25 माजी नगरसेवकांनी मंगळवारी भगवा झेंडा खांद्यावर घेतला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. या पक्षप्रवेशाने महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये शिंदे गटाला जागा वाटपात झुकते माप मिळणार आहे.

Advertisement

माजी महापौर सुनील कदम, निलोफर आजरेकर व प्रतिभा नाईकनवरे यांच्यासह 25 माजी नगरसेवकांनी मंगळवारी रात्री मुबंई येथे मुक्तागिरी या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश केला. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजित कदम उपस्थित होते.

या पक्ष प्रवेशामध्ये काँग्रेसचे दहा, भाजपाचे सात व अजित पवार गटाचे दोन माजी नगरसेवक आहेत. या पश्न प्रवेशाने जिल्ह्यातील मातब्बर प्रमुख नेत्यांना शिवसेनेने धोबीपछाड दिल्याचे मानले जात आहे. मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांना धक्का देणारा हा पक्षप्रवेश झाला आहे.

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी महापौर सुनील कदम, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर प्रतिभा नाईकनवरे, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक आनंदराव खेडकर, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, जहाँगीर पंडत, भरत लोखंडे, रशीद बारगीर, महेश कदम, अभिजीत चव्हाण, माजी नगरसेविका अनुराधा खेडकर, रिना कांबळे, पूजा नाईकनवरे, संगीता सावंत, अश्विनी बारामते, गीता गुरव यांचा समावेश आहे.

पूर्वाश्रमीचे ताराराणीचे नेते व सध्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक असलेले सत्यजित कदम यांचे समर्थक माजी नगरसेवक अर्चना पागर, कबिता माने, सीमा कदम यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीपासून महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा होती.

विधानसभेनंतर महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांनी काँग्रेसपासून फारकत घेतल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी कोण कोण व किती नगरसेवक शिवसेनेत जाणार हे समजत नव्हते. यावर पालकमंत्री, आमदार वारंवार या पक्ष प्रवेशाबाबत काँग्रेसला लवकरच सुरुंग लावणार, असे म्हणत होते.

या पार्श्वभूमीवर सोमवारी कोल्हापुरातून जवळपास २० माजी नगरसेवक मुंबईकडे पक्षप्रवेशासाठी रवाना झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी या बंगल्यात मंगळवारी रात्री पक्षप्रवेश झाला. यावेळी कोल्हापुरातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह उपसरंपच अशा १७जणांचाही शिवसेनेत पक्षप्रवेश झाला.

मावळत्या सभागृहात महापौर राहिलेल्या माजी महापौर निलोफर आजरेकर या मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर याच्या स्नुषा अपश्न म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांना काँग्रेसने महापौर निवडीसाठी बिनशर्त पाठिंबा दिल्याने त्या महापौर झाल्या होत्या.

या पश्न प्रवेशात त्यांच्या स्नुषा व दोन मुलांनीही शिवसेनेत प्रवेश केल्याबाबत गणी आजरेकर यांना विचारले असता, त्यांनी मी यापूर्वी कोणत्याही पक्षात नव्हतो व आजही कोणत्या पक्षात नसल्याचे सांगत दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर यांनी या पक्षप्रवेशात माझा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. अनेकांनी शिंदे सेनेला पसंती दिल्याने कोल्हापूरमधून कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह अन्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

अजून प्रवेश बाकी

"महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर झालाय एक उपमहापौर आणि पदाधिकाऱ्यांसह २५ जणांचा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशामुळे कोल्हापूर पालिकेवर भगवा निश्चितच फडकणार यात शंका नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे."

पक्षात आलेल्या सर्वांचे स्वागत

"शिवसेनेत आलेल्या सर्वांचे स्वागत आहे. एकनाथ शिंदे सर्वांना न्याय देतील. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण सर्वजण ताकदीने लढू."

महापौर शिवसेनेचाच

"आजच्या पक्षप्रवेशाने विशेषतः कोल्हापूर दक्षिणमध्ये शिवसेनेला मोठी ताकद मिळाली आहे. पुढील विधानसभेत कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरचा आमदार हा शिवसेनेचा असेल. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भगवा फडकवून महापौर शिवसेनेचा करुन बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करु."

Advertisement
Tags :
(Mumbai)@kolhapur#Eknath Shinde#prakash abitkar#Rajesh Kshirsagar#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediashivsenaShivSena Shinde faction
Next Article