For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

25 उमेदवारांची बसपकडून घोषणा

06:26 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
25 उमेदवारांची बसपकडून घोषणा
Advertisement

7 मुस्लीम चेहरे :  रामपूरमधून झीशान, सहारनपूरमधून माजिद अली यांना तिकीट

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

बहुजन समाज पक्षाने रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस मेवालाल गौतम यांनी पक्षाच्या उमेदवारांची घोषणा केली. 16 जणांच्या पहिल्या यादीनंतर सायंकाळी आणखी 9 जणांची दुसरी यादी जाहीर करत दिवसभरात एकूण 25 उमेदवार जाहीर केले. बसपाने सहारनपूरमधून माजीद अली यांना तिकीट दिले आहे. बसपच्या वतीने अमरोहा मतदारसंघातून मुजाहिद हुसैन यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. या जागेवर काँग्रेसने बसपाचे माजी नेते दानिश अली यांना उमेदवारी दिली आहे.

Advertisement

बसपने पहिल्या यादीत सात मुस्लीम उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या सात नावांमध्ये सहारनपूरमधून माजिद अली, अमरोहा मतदारसंघातून मुजाहिद हुसेन, मुरादाबादमधून मोहम्मद इरफान सैफी, रामपूरमधून झीशान खान, संभलमधून शौलत अली, आमलामधून आबिद अली, पीलीभीतमधून अनीस अहमद खान उर्फ फूलबाबू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.