जिल्हा पंचायतीसाठी राज्यात चौथ्या दिवशी 25 अर्ज
आतापर्यंत एकूण 76 अर्ज दाखल : 20 रोजी होणार निवडणूक
प्रतिनिधी/ पणजी
जिल्हा पंचायतीच्या येत्या दि. 20 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेंतर्गत शनिवारी चौथ्या दिवशी एकूण 25 अर्ज दाखल झाले आहेत. त्याद्वारे आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांची संख्या 76 वर पोहोचली आहे.
राज्यातील 50 जि. पं. मतदारसंघांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी दि. 1 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता. त्यासाठी गुऊवारपर्यंत 12, शुक्रवारी 39 आणि काल शनिवारी 25 मिळून एकूण 76 अर्ज दाखल झाले आहेत.
शनिवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये अमिता हरमलकर (धारगळ-भाजप), श्रीकृष्ण हरमलकर (धारगळ-भाजप), अनिल हरमलकर (धारगळ-आरजी), नारायण शिरोडकर (तोरसे-आरजी), राघोबा कांबळी (तोरसे-भाजप), कार्तिक कुडणेकर (सुकूर-अपक्ष), तिओतिनो लोबो (सुकूर-आरजी), आर्लेन ब्रागांझा (रेईश मागूश-आरजी), रोहन धावडे (पेन्ह द फ्रान्स-आरजी), विजू दिवकर (ताळगाव-काँग्रेस), कृष्णराव राणे (लाटंबार्से-अपक्ष), सुंदर नाईक (पाळी-भाजप), धुलू शेळके (नगरगांव-अपक्ष), नीलेश गांवकर (नगरगांव-आरजी), संजीवनी तळेकर (बेतकी खांडोळा-अपक्ष), दिपंती शिरोडकर (शिरोडा-आरजी), आंतोनेत फर्नांडिस (राय-आरजी), फातिमा गांवकर (राय-अपक्ष), सेबेस्तियांव सिल्वेरा (नुवे-आरजी), अँथोनी रॉबर्ट (कोलवा-आरजी), डॅग्ली फर्नांडिस (वेळ्ळी-आरजी), प्रदीप वेर्लेकर (दवर्ली-अपक्ष), विवेक नाईक (कुडतरी-अपक्ष), रामानंद नाईक (शेल्डे-अपक्ष), आंजेलीन तेलीस (कुठ्ठाळी-आरजी) यांचा समावेश आहे.