महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाहतूक नियम उल्लंघनप्रकरणी 25. 65 कोटींचा दंड वसूल

12:32 PM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई करुन यावर्षाच्या दहा महिन्यांत 4 लाख 38 हजार 989 वाहनचालकांकडून तब्बल 25 कोटी 65 लाख 37 हजार 500 ऊपये दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.87 टक्के कारवाईत वाढ झाली आहे, तर 60.73 टक्के एवढी दंडात वाढ झाली आहे. धोकादायक पार्किंग केल्यामुळे 74 हजार 530 जणांकडून 3 कोटी 75 लाख 4 हजार 100 ऊपये दंड म्हणून वसूल करण्यात आले आहेत. हेल्मेट परिधान न केल्यामुळे 31 हजार 950 जणांकडून 3 कोटी 25 लाख 66 हजार ऊपये दंड वसूल केला आहे. 1 हजार ,462 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 12 अल्पवयीन मुलांनी वाहन चालविल्यामुळे 85 हजार 500 ऊपये दंड वसूल केला आहे.

Advertisement

राज्यात अपघाती मृत्यूत वाढ होत असल्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात विशेष मोहिमांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने अतिवेगाने वाहन हाकणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, सीट बेल्ट न घालणे, वाहनांना काळ्या काचा लावणे, हेल्मेट परिधान न करणे अशा प्रकारांचा समावेश आहे. गोवा पोलिसांच्या वाहतूक नियम उल्लंघन आकडेवारीनुसार, राज्यात 2023 च्या दहा महिन्यांत वाहतूक नियम उल्लंघन केल्यामुळे 4, लाख 38 हजार 989 वाहनचालकांकडून 25 कोटी 65 लाख 37 हजार 500 ऊपये दंड वसूल केला आहे. 2022 च्या वरील कालावधीत 4 लाख, 26 हजार 739 वाहनचालकांकडून 15 कोटी 96 लाख 2 हजार 800 ऊपये दंड वसूल केला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 2.87 टक्के कारवाईत तर 60.73 टक्के दंडात वाढ झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article