कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तासगांवात श्री गणपतीश्रींचा २४६ वा वाढदिवस उत्साहात

05:09 PM Mar 02, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

तासगाव : 

Advertisement

येथील श्री गणपती पंचायतन देवस्थानच्या श्री गणेश मंदिरात श्री गणपतीश्रींचा २४६ वा वाढदिवस (प्राण प्रतिष्ठापना दिन) शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरात श्रींच्या आसनस्थानास व मुख्य कमानीस आकर्षक फुलांसह आरास करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परशुरामभाऊ पटवर्धन यांनी फाल्गुन शुध्द व्दितीया १७७९ मध्ये श्री गणेश मंदिराची उभारणी करून तेथे श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठापना केली आहे. तोच प्राण प्रतिष्ठापना दिवस तिथी नुसार मंदिराचा वर्धापन दिन (श्रींचा वाढदिवस) म्हणून पटवर्धन कुटुंबियांच्या वतीने साजरा केला जातो.

Advertisement

सकाळी मुख्य पुजारी दिपक जोशी, अनंत जोशी, अथर्व जोशी यांच्या उपस्थितीत श्रींची पुजा व अभिषेक, होमहवन, आरती झाल्यानंतर दुपारी महाआरती झाली. श्री गणपती पंचायतनचे विश्वस्त राजेंद्र पटवर्धन, सौ. सितारा राजेंद्र पटवर्धन, राहुल पटवर्धन, महाव्यवस्थापक पवनसिंह कुडमल यांनी  श्रींचे दर्शन घेऊन भेटवस्तू अर्पण केली.

श्रींच्या वाढदिवसानिमित्त श्रींच्या आसनस्थानाच्या ठिकाणी तसेच गाभाऱ्याच्या कमानीस फुलांची आकर्षक आरास केली होती. श्रींच्या समोरच असलेल्या नंदीच्या व गरुडाच्या मंदिरास केलेली फुलांची आरास गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होती. गाभाऱ्यासह मंदिराच्या चौफेर लावण्यात आलेले केळीचे खुंट, परिसरात काढण्यात आलेली रांगोळी शोभा वाढवत होती.

श्रींच्या वाढदिवसानिमित्त पुण्याहवाचन, संकल्प, श्रींचा स्वपन विधी, द्रव्ययुक्त षोडशोपचार पूजा, शांती, होम हवन, श्रींची महापूजा असे धार्मिक विधी पार पडले. दुपारी ह. भ. प. गजाननबुवा वठारकर यांचे कीर्तन झाले. सायंकाळी ६.३० वाजता गौरी गजलक्ष्मीच्या नेतृत्वात फटाक्यांच्या आतषबाजीत सवादय पालखीतून छबिना काढण्यात आला.

याबाबत बोलताना विश्वस्त राजेंद्र पटवर्धन यांनी गेल्या २४६ वर्षापासून श्रीं चा वाढदिवस अखंडीत साजरा करण्यात येत आहे असे स्पष्ट केले. वाढदिवस साजरा करण्याचा उद्देश सांगताना गाव समृध्द व्हावे, गावाची प्रसिध्दी व्हावी, भक्तीत वाढ व्हावी असे सांगितले. पवनसिंह के कुडमल, अथर्व जोशी, अशोक कुंभार, दिलीप पवार, प्रताप पवार, भूपाल माने, महादेव माळी, लक्ष्मण कांबळे, मनोज गुरव आदींनी परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article