महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शहर परिसरात 24 हजार रोप लागवड करणार

10:55 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वनखात्याचे नियोजन : रस्त्याकडेचे धोकादायक वृक्ष त्वरित हटविण्याची नगरसेवकांची मागणी

Advertisement

बेळगाव : शहरातील अनेक वॉर्डांसह महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यांच्या बाजूने जुनाट धोकादायक वृक्षांचा प्रश्न गंभीर असून सदर धोकादायक वृक्ष त्वरित हटविण्यात यावेत. शहरामध्ये नवीन रोपे लावण्यासाठी नागरिक व संघ-संस्थांचे सहकार्य घेऊन वृक्षसंपदा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवकांकडून मांडण्यात आले. यावेळी शहर परिसरात 24 हजार रोप लागवडीचे नियोजन करण्यात आल्याची माहिती वनखात्याने दिली. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील वनराई वाढविण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात आली. सध्या पावसाळा सुरू झाला असून धोकादायक वृक्ष अचानक कोसळून नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. ही गंभीर बाब असून वनखात्याला माहिती देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. वनखात्याकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याबद्दल वनखात्याच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारण्यात आला. शहरामध्ये अनेक वॉर्डांसह महत्त्वाच्या रहदारीच्या रस्त्यांवर धोकादायक वृक्ष आहेत.

Advertisement

त्यांचा तात्काळ सर्व्हे करून सदर वृक्ष त्वरित हटविण्यात यावेत, अशी सूचना वनखात्याच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली. पावसाळ्यामध्ये शहरात वृक्ष पडल्यानंतर हटविण्यासाठी वनखात्याकडून तत्काळ प्रतिसाद दिला जात नाही. यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. मनपाच्या दिमतीला सदर अधिकारी नेमून द्यावेत, अशी सूचना मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांनी केली. यावेळी वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून या सूचनांचे पालन केले जाईल. शहरातील धोकादायक वृक्ष हटविण्यासाठी लवकरच सर्वेक्षण करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. शहर व परिसरात 24 हजार रोपे लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरामध्ये 3 हजारांहून अधिक रोपे लावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नगरसेवक मुजम्मील डोणी यांनी सदर रोपे लावल्यानंतर त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी सेवाभावी संस्थांकडे देण्याचे सांगितले. काही जणांनी रोप लावण्यात येणाऱ्या ठिकाणी असणाऱ्या घरमालकांवर रोप वाढविण्याची जबाबदारी सोपवून सामाजिक बांधिलकी राखण्याच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील वृक्षसंपदेवर कुऱ्हाड आल्याने शहराचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासाठी आतापासूनच रोप लागवड करून वृक्ष संवर्धन करणे गरजेचे असल्याचे नगरसेवकांतून सांगण्यात आले.

तात्काळ दखल घेतली जाईल

हेस्कॉमकडून झाडांच्या धोकादायक फांद्या हटवून भविष्यातील धोका दूर केला पाहिजे. तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांतून तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी दखल घेतली जात नसल्याचा आरोप नगरसेवकांतून करण्यात आला. यापुढे असे होणार नसून तात्काळ दखल घेतली जाईल, असे हेस्कॉम अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article