For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीज कामगाराच्या मृत्यू प्रकरणाची 24 तासात चौकशी

12:31 PM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
वीज कामगाराच्या मृत्यू प्रकरणाची 24 तासात चौकशी
Advertisement

अभियंते दोषी आढळल्यास कडक कारवाई

Advertisement

मडगाव : पोर्तावाडा-शिवोली येथे वीज खांबावर चढून काम करून खाली उतरताना अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने कृष्णा पवार (38) या लाईनमेनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी घेतली असून या प्रकरणाची 24 तासात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून वीज खात्याचे कनिष्ठ व साहाय्यक अभियंते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कृष्णा पवार या लाईनमेनच्या मृत्यूवर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. हा अपघाती मृत्यू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वीज खांबावरील काम संपल्यानंतर कृष्णा पवार हे खाली उतरत असतानाच त्यांना विजेचा शॉक लागला व त्यांना मृत्यू आला. या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली असून सर्व संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे. या प्रकरणाची 24 तासांच्या आत चौकशी करण्याचे आदेश वीज खात्याच्या प्रधान अभियंत्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

मयताच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरीसाठी प्रयत्न

Advertisement

दरम्यान, मयत कृष्णा पवार यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले आहे. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करणार असून वीज खात्याच्या प्रधान अभियंत्यांची देखील ती जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. कृष्णा पवार यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर आलेल्या परिस्थितीची जाणीव आपल्याला आहे. त्यांना वीज खात्याकडून नुकसानभरपाई दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.