महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरातील 16 हजार नळांना 24 तास पाणी

11:03 AM Jan 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एलअँडटीकडून नियोजन : उर्वरित भागातही काम सुरू

Advertisement

बेळगाव : एलअँडटी कंपनीकडून शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सद्यस्थितीत 16 हजार नळांना दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या वर्षभरात महापालिका कार्यक्षेत्रात 24 तास पाणीपुरवठ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यादृष्टिकोनातून एलअँडटीचे एक पाऊल पुढे पडताना दिसत आहे. शहरातील आंबेडकरनगर, कुलकर्णी लेआऊट, गोकाक रोड, सिद्धेश्वरनगर, रामतीर्थनगर, रेव्ह्यूनी कॉलनी, कुलकर्णी कॉलनी, पाटील गल्ली, एकलव्य गल्ली, सागर गल्ली, लक्ष्मी गल्ली, मठ गल्ली, शांतीसागर गल्ली, जवान क्वॉर्टर्स, संतसेना रोड, आरपीडी मेन रोड, जैन बसती, हुलबत्ते कॉलनी, एसपीएम रोड, आठले गुरुजी रोड, यासह मुत्यानट्टी, आरसीनगर आणि कणबर्गी येथील काही घरांना 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे सद्या 16 हजार नळांना दैनंदिन पाणीपुरवठा होत आहे.

Advertisement

यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयाची पाणीपातळी टिकून आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात पाणीसमस्या निर्माण झाली होती. त्यामुळे एलअँडटी समोर पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र यंदा जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. शिवाय शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी 9 जलकुंभ उभारले आहेत. या जलकुंभांचे कामही पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे लवकरच शहरात 24 तास पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी होणार आहे. शहरातील जलवाहिन्या घालण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. काही भागात जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. प्रायोगित तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शहर आणि परिसरातील 16 हजार नळांना दररोज पाणी येऊ लागले आहे.

लवकरच शहरात 24 तास पाणीपुरवठा  

शहरातील 14 हजार नळांना दररोज पाणीपुरवठा केला जात आहे. तर मुत्यानट्टी,आरसीनगर आणि काकती परिसरातील 1600 नळांना दररोज पाणीपुरवठा होत आहे. 24 तास पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिन्यांचे कामही सुरू आहे. लवकरच शहरात 24 तास पाणीपुरवठा होणार आहे.

- धीरज उभयंकर (एलअँडटी मॅनेजर)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article