महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

230 वर्षे जुने थिएटर

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सौंदर्यामागे फिके आलिशान सिनेमा हॉल

Advertisement

इटलीच्या व्हेनिस शहरात असलेल्या ट्रॅटो ला फेनिस एक प्रसिद्ध थिएटर आणि ओपेरा हाउस आहे. हे थिएटर सुमारे 231 वर्षे जुने आहे. हे थिएटर इतके सुंदर आहे की याच्या सौंदर्यासमोर चांगल्यातील चांगले सिनेमा हॉल देखील फिका दिसतो. जेव्हा लोक येथे शो पाहण्यासाठी येतात, तेव्हा ते जादुई युगात असल्याचा अनुभव घेत असतात. या थिएटरची भव्यता आणि संगीतात लोक हरवून जात असतात. आता याच थिएटरशी निगडित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत थिएटरची भव्यता आणि सौंदर्य पाहता येते. हे थिएटर 190 ते 1792 दरम्यान निर्माण करण्यात आले होते. 1836 आणि 1996 मध्ये आग लागल्याने या थिएटरचे मोठे नुकसान झाले होते, परंतु दरवेळी हे थिएटर त्याच्या मूळ डिझाइनमध्ये पुन्हा तयार करण्यात आले आहे. 1996 मध्ये लागलेल्या आगीत तर हे थिएटर पूर्णपणे नष्ट झाले होते, परंतु 14 डिसेंबर 2003 रोजी याच्या दुरुस्तीनंतर हे पुन्हा लोकांसाठी खुले करण्यात आले होते.

Advertisement

ट्रॅटो ला फेनिस या इटालियन नावाचा अर्थ ‘द फिनिक्स थिएटर’ असा होतो. आगीमुळे मरून जाणाऱ्या आणि त्याच्या राखेतून पुनर्जन्म घेणाऱ्या पौराणिक पक्ष्यावर हे नाव आधारित आहे. याचमुळे या थिएटरने स्वत:च्या राखेतून दोनवेळा पुनर्जन्म घेतला असल्याचे बोलले जाते. आजही हे ओपेरा आणि संगीत कार्यक्रमासाठी जगातील सर्वात आघाडीच्या ठिकाणांपैकी एक आहे. या थिएटरमध्ये इतिहासातील काही महान कलाकार आणि संगीतकारांनी स्वत:चा शो सादर केला आहे. या थिएटरचे डिझाइन एंटोनियो सेल्वा यांच्याकडून तयार करण्यात आले होते. हे थिएटर 16 मे 1792 रोजी खुले झाले होते. या थिएटरमध्ये 1,126 लोक सामावले जाऊ शकतात. ही इमारत स्वत:च्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असून यात दरवर्षी 100 हून अधिक ओपेरा कार्यक्रमांचे आयोजन होत असते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article