महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिहारमध्ये विषारी दारूचे आणखी 23 बळी

06:03 AM Apr 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 पूर्व चंपारण्य जिल्हय़ातील घटना ः 12 आरोपींना अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

Advertisement

बिहारच्या पूर्व चंपारण्य जिल्हय़ात मागील 24 तासांमध्ये विषारी दारूचे प्राशन केल्याने कमीतकमी 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेला दुःखद ठरविले आहे. याचबरोबर त्यांनी अधिकाऱयांकडून यासंबंधी विस्तृत माहिती मागविली आहे. तर दुसरीकडे विषारी दारूने अनेकांचा बळी घेतल्यावर पोलीस आणि अबकारी विभागाकडून छापे टाकले जात आहे. याप्रकरणी दोन सहाय्यक उपनिरीक्षक आणि चार पोलीस कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आहे.

पूर्व चंपारण्यचे पोलीस अधीक्षक कांतेश कुमार मिश्रा यांनी या घटनेची पुष्टी देत विषारी दारूच्या प्राशनामुळे 23 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तर प्रकृती गंभीर असलेल्यांवर जिल्हय़ातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती दिली. विषारी दारूची निर्मिती आणि विक्रीप्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. तर दारूविक्री रोखण्यासाठी कारवाई न केल्याप्रकरणी 6 पोलिसांना निलंबित करण्यात आल्याचे मिश्रा यांच्याकडून सांगण्यात आले.

विषारी दारूने बळी घेतलेल्या गावांमध्ये जिल्हा प्रशासनाने खबरदारीदाखल वैद्यकीय पथके तैनात केली आहेत. तर संबंधित भागात एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत आणले गेलेल्या दारूच्या प्राशनानंतरच हे बळी गेल्याचे समोर आले आहे.

भाजपकडून नितीश सरकार लक्ष्य

याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करत बिहार भाजप नेते विजय कुमार सिन्हा यांनी राज्यात अर्धवट मनाने दारूबंदी लागू करण आणि सरकारचे दारूविक्रीवर नियंत्रण नसल्याने अशाप्रकारच्या घटना घडत असल्याचा आरोप केला आहे. पूर्व चंपारण्य जिल्हय़ात विषारी दारूने घेतलेले बळी हे सरकारचे अपयश दर्शविणारे आहेत. राज्यातील स्थिती नियंत्रणाबाहेर गेली असताना नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजप नेते संजय जायस्वाल यांनी केला आहे.

बिहारमध्ये दारूबंदी

राज्यात सतर्कपणे प्रशासन चालविले जात आहे. लोकांनीच वाईट सवयी सोडून द्यायला हव्यात अशी भूमिका मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मांडली आहे. बिहारमध्ये 2016 मध्ये नितीश कुमार सरकारकडून दारूबंदी लागू करण्यात आली आहे. दारूबंदी असतानाही राज्यात सर्रासपणे दारूविक्री होत आहे. मद्यपींना सहजपणे दारू उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article