केदारनाथ मंदिरातून २२८ किलो सोने गायब : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा आरोप
मंदिर समितीने चोरीचे आरोप फेटाळले : दिल्लीत नव्या मंदिरामुळे केदारनाथधाम येथे नाराजी
उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये बांधण्यात आलेल्या केदारनाथ मंदिरावरून राजकीय गदारोळ सुरू असतानाच ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे एक महत्त्वाचे वक्तव्य आले आहे. केदारनाथ धाममधून मोठ्या प्रमाणात सोने गायब झाल्याचा दावा त्यांनी केला. शंकराचार्यांनी याला थेट घोटाळाच म्हटले आहे. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की, उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोने गायब झाले आहे. 16 जुलै 2024 रोजी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, "तुम्ही लोक हा मुद्दा का मांडत नाहीत?"शंकराचार्यांनी पुढे विचारले की, केदारनाथ धाममध्ये घोटाळा झाला तेव्हा तुम्ही दिल्लीत केदारनाथ बांधणार का? स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, तेथे (दिल्लीत) आणखी एक घोटाळा (केदारनाथ मंदिर बांधून) होणार आहे. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या म्हणण्यानुसार, "केदारनाथ घोटाळ्यासाठी कोण जबाबदार आहे याची चौकशी का होत नाही?" या प्रश्नावर शंकराचार्य म्हणाले की, आमच्या (हिंदूंच्या) धार्मिक स्थळांमध्ये आता राजकीय लोक हस्तक्षेप करत आहेत? हा एक अनधिकृत प्रयत्न आहे.
मंदिर समितीने चोरीचे आरोप फेटाळले
पुजाऱ्याच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बद्री केदारनाथ धाम मंदिर समितीने पत्रक काढून सदर आरोप फेटाळून लावले आहेत.