For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

जेएसडब्ल्यूच्या नफ्यात 225 टक्के वाढ

06:43 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
जेएसडब्ल्यूच्या नफ्यात 225 टक्के वाढ
Advertisement

जुलै-सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

जेएसडब्ल्यू स्टीलने जुलै ते सप्टेंबर अवधीतल्या तिमाहीत 5279 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. हा नफा मागच्या तुलनेत तब्बल 225 टक्के जास्त असल्याची माहिती कंपनीने शेअरबाजाराला दिली आहे. आर्थिक वर्ष 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल कंपनीने नुकताच जाहीर केला आहे.

Advertisement

54 हजार कोटींचा महसूल

मागच्या वर्षी याच अवधीत कंपनीने 1623 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला होता. याचदरम्यान सदरच्या तिमाहीत कंपनीने 21 टक्के वाढीसह 54,486 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी समान अवधीत म्हणजे जुलै ते सप्टेंबरच्या अवधीत 45,152 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. याचदरम्यान कंपनीचा खर्च 12 टक्के वाढत 48,168 कोटी रुपयांवर पोहचला आहे.

7 लाख टन उत्पादन

कंपनीने याच अवधीत सर्वाधिक कच्च्या पोलादाचे उत्पादन घेण्याची किमया साध्य केली आहे. जुलै ते सप्टेंबर अवधीत कंपनीने 7.27 दशलक्ष टन इतक्या कच्च्या पोलादाचे उत्पादन घेतले होते.

Advertisement
Tags :

.