435 वर्षांपासून समुद्रात होता 22 टन सोने-चांदीचा खजिना
अशाप्रकारची आणखी 250 जहाजं समुद्रात
एलेक्झेंडर मॉन्टीरो नावाचे एक पोर्तुगाली पुरातत्व तज्ञ आहेत, पोर्तुगालच्या आसपासच्या समुद्रात 250 जहाजे बुडालेली असून त्यावर खजिना आहे. एका जहाजावर कमीतकमी 22 टन सोने आणि चांदी असेल. हा खजिना ज्याला मिळेल तो जगातील सर्वात धनाढ्या इसम ठरणार असल्याचा दावा मॉन्टीरो यांनी केला आहे.
1589 मध्ये लिस्बनच्या दक्षिणेस एक स्पॅनिश गॅलियोन जहाज ट्रोजन बेटानजीक बुडाले होते. विशेषकरून नोसा सेनहोरा डो रोजारिया सागरी भागात. यात 22 टन सोन आणि चांदी असल्याची अपेक्षा आहे. एक खास प्रकारचा डाटाबेस मी तयार केला असल्याचे मॉन्टीरो यांनी सांगितले आहे.
आसपास 8620 जहाजं बुडालेली
या डाटाबेसमध्ये मदीरा, अजोर्स आणि देशाच्या न्य भागांमध्ये कुठे कुठे खजिन्याने भरलेली जहाजं बुडालेली आहेत याचा उल्लेख आहे. ही सर्व जहाजं 16 व्या शतकापासून आतापर्यंत बुडालेली आहेत. पोर्तुगालच्या आसपास बुडणाऱ्या जहाजांची संख्या सुमारे 8620 इतकी आहे. पोर्तुगालकडे या खजिन्यांना सुरक्षित ठेवण्याची आणि सांभाळण्याची सुविधाच नाही.
खजिन्याची सागरी सुरक्षा आवश्यक
देशाच्या अन्य पुरातत्व तज्ञांनुसार खजिना लुटणारे या जहाजांमधून समुद्रातूनच खजिना घेऊन जाऊ शकतात. त्यांना कुणीच रोखू शकणार नाही. याचमुळे प्रथम अशा जहाजांना शोधले जाणे गरजेचे आहे. मग त्यांना सागरी स्वरुपात सुरक्षित केले जावे. यानंतर खजिना बाहेर काढत योग्य ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता आहे.
पोर्तुगाल हे जगातील सर्वात वसाहतवादी देश राहिला आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडात या देशाच्या अनेक वसाहती होती. 15 व्या ते 17 व्या शतकादरम्यान पोर्तुगालचे शासन अनेक देशांवर होते, परंतु नंतर अनेक देश याच्या शासनातून मुक्त झाले होते. यात ब्राझील, अंगोला, मोझाम्बिक आणि अन्य काही देश आहेत.