गेमी वादळामुळे चीनमध्ये 22 जणांचा मृत्यू
06:52 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बीजिंग : चीनमध्ये गेमी चक्रीवादळामुळे मोठी हानी झाली आहे. चक्रीवादळामुण् एकूण 22 जणांना जीव गमवावा लागला आहे. हुनान प्रांतात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अतिवृष्टी होत आहे. जिक्सिंग येथील बेपत्ता झालेल्या लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अतिवृष्टीमुळे शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. तर 11 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागले आहे. गेमी चक्रीवादळामुळे चीन आणि उत्तर कोरियात अतिवृष्टी झाल्याने यालु नदीला पूर आला आहे.
Advertisement
Advertisement