सीरियात चर्चमध्ये आत्मघाती हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू
06:22 AM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
दमास्कस :
Advertisement
सीरियन राजधानी दमास्कसमध्ये रविवारी रात्री झालेल्या भयानक आत्मघाती हल्ल्यात किमान 22 जण ठार तर 63 जण जखमी झाले. अनेक लोक प्रार्थनेला उपस्थित असताना ग्रीक ऑर्थोडॉक्स सेंट एलियास चर्चमध्ये हा हल्ला झाला. इस्लामिक स्टेटशी (आयसिस) संबंधित एका दहशतवाद्याने चर्चमध्ये घुसून प्रथम गोळीबार केला आणि नंतर स्वत:ला उडवून दिले. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री हा हल्ला झाला.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्लेखोरासोबत आणखी एक बंदूकधारी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. स्फोटापूर्वी बंदुकधाऱ्याने गर्दीवर गोळीबार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेवेळी चर्चमध्ये सुमारे 150 ते 350 लोक उपस्थित होते. स्फोटामुळे चर्चचे प्रचंड नुकसान झाले असून आतील लाकडी साहित्य जळून व तुटून पडलेले दिसत आहे.
Advertisement
Advertisement