For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने २१ वर्षीय युवकाचा अंत; संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर, वाठार स्टेशन परिसरात तीव्र आंदोलन!

11:23 AM May 27, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने २१ वर्षीय युवकाचा अंत  संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर  वाठार स्टेशन परिसरात तीव्र आंदोलन
Advertisement

                          रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने २१ वर्षीय युवकाचा मृत्यू; साताऱ्यात संताप

Advertisement

सातारा : वेळेवर रुग्णवाहिका सेवान मिळाल्यामुळे २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत बाठार स्टेशन परिसरातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संबंधित युवकाचा भीषण अपघात झाल्यानंतर तो गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असताना त्याला तातडीची वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक होते. मात्र अनेक वेळासंपर्क करूनही वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचा आरोप नातेवाईक व ग्रामस्थांनी केला आहे.

Advertisement

अखेर नाईलाजास्तव कुटुंबीयांनी युवकाला खासगी पिकअप बाहनातून सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

घटनेनंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. "वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती तर युवकाचा जीव वाचू शकला असता," अशी भावना व्यक्त करतप्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांनी बाठार स्टेशन परिसरात कायमस्वरूपी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये संबंधित ठेकेदाराने दिशादर्शक फलक, सुरक्षा सूचना व अपघात प्रतिबंधक उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. "एका निष्पाप युवकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?" असा सवाल उपस्थित करत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.