रेल्वे रुळावरील अपघातात जखमी झालेल्या कुडचडेतील 21 वर्षीय युवकाचा मृत्यू
12:15 PM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
कुडचडे : रेल्वे रुळावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुडचडे येथील 21 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 11 सप्टेंबर रोजी घडली होती.
Advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबर रोजी संबंधित युवक रेल्वे रुळावरील अपघातात जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्रकृती खालावली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे कुडचडे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताची नेमकी कारणे जाणून घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
Advertisement
Advertisement