For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलिस इन्स्पेक्टर असल्याचे सांगून २१ महिलांची केली फसवणूक... चोर असा सापडलाच

07:07 PM May 23, 2026 IST | NEETA POTDAR
पोलिस इन्स्पेक्टर असल्याचे सांगून २१ महिलांची केली फसवणूक    चोर असा सापडलाच
Advertisement

गुजरातमध्ये एका व्यक्तीने एका मॅट्रिमोनिअल साइटवर पोलीस उपनिरीक्षक (PSI) असल्याचे भासवून एक-दोन नव्हे, तर तब्बल २१ महिलांची फसवणूक केली. लग्नाचे आमिष दाखवून एक पोलीस अधिकारी महिलांची फसवणूक करत असल्याची तक्रार अहमदाबाद पोलिसांनी सुरू केली असता, एक ठक पोलीस निरीक्षक असल्याचे भासवून व्यावसायिकरित्या महिलांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले. अहमदाबाद गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे.

Advertisement

नामांकित साईट्सवरुन फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार Shaadi.com, Jeevansathi.com आणि इतर काही नवीन मॅट्रिमोनिअल साइट्सवर आयडी तयार करून आरोपीने फसवणूक केली होती. ही घटना गुजरातमधून उघडकीस आली. लग्नाचे आमिष दाखवून एक पोलीस अधिकारी महिलांची फसवणूक करत असल्याची तक्रार अहमदाबाद पोलिसांनी सुरू केली असता, एक ठग पोलीस निरीक्षक असल्याचे भासवून व्यावसायिकरित्या महिलांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले. अहमदाबाद गुन्हे शाखेने आरोपीला अटक केली आहे. त्याने Shaadi.com, Jeevansathi.com आणि इतर काही नवीन मॅट्रिमोनिअल साइट्सवर आयडी तयार करून ही फसवणूक केली होती.

Advertisement

पोलिस काय म्हणाले?

अहमदाबाद पोलिसांचे एएसपी भरत पटेल यांनी सांगितले की,आरोपीने महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी एआय-निर्मित प्रतिमांचा वापर केला.या प्रतिमांमध्ये तो पोलिसांच्या गणवेशात दिसत होता.त्याने डिजिटल शिक्के आणि डिझाइन साधनांचा वापर करून बनावट सरकारी ओळखपत्रे, नियुक्तीपत्रे आणि निलंबनाच्या सूचनाही तयार केल्याचा आरोप आहे.पोलिसांनी सांगितले की,पांचाल सोशल मीडिया आणि वैवाहिक प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना लक्ष्य करत असे,त्यानंतर त्यांना भावनिकरित्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करत असे.

कायदेशीर अडचणी असल्याचं नाटक

आरोपी त्याच्या संपर्कात आलेल्य़ा महिलांना कायदेशीर अडचण, निलंबन आणि पैशांची अचानक अडचण आली ही कारणं सांगून त्यांच्याकडून पैसे मागत असे. त्याच्या या खोटेपणाला भाळून अनेक महिलांनी स्वत:चे आर्थिक नुकसान केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पांचालने मध्यप्रदेश, राजस्थान महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्येही महिलांची आर्थिक फसवणूक केली आहे. या त्याच्या खोटेपणावर विश्वास ठेवून अनेक महिलांनी त्याला मोठी रक्कम ट्रान्सफर केली. अहमदाबादमधल्या नरोडा आणि नवरंगपुरा परिसरातल्य़ा महिलांनी जेव्हा पोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा पांचालचा मुखवटा समोर आला

Advertisement
Tags :

.