कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kokan News : मिरकवाडा बंदरात 21 नौकांचा अडथळा, 'त्या' मालकांवर फौजदारीची मागणी

01:55 PM May 14, 2025 IST | Snehal Patil
Advertisement

रत्नागिरी तालुका पर्ससीननेट मच्छीमार असोसिएशनची मत्स्य विभागात धाव

Advertisement

रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदीसाठी अजून 20 दिवस बाकी असताना यावर्षी 21 नौकांना शाकारून ठेवत मिरकरवाडा जेटींवर इतर नौकांना येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे पर्ससीननेट मच्छीमार रत्नागिरी तालुका असोसिएशनने सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडे मंगळवारी धाव घेत इतर नौकांना जेटी मोकळी करून देण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली.

Advertisement

नोटीस देवूनही शाकारून ठेवलेल्या नौका जेटीवरून न हलवणाऱ्या नौका मालकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. त्या बाबत दिलेल्या निवेदनानुसार, पावसाळी मासेमारी बंदी 31 मे पासून सुरु होत आहे. यंदाचा मासेमारी हंगाम फायद्यात गेलेल्या 21 नौका मालकांनी त्यांच्या नौका मिरकरवाडा बंदरातील जेटींवर शाकारून ठेवल्याची तक्रार पर्ससीननेट मच्छीमार रत्नागिरी तालुका असोसिएशनने मांडली आहे.

या हंगामात नुकसान भरून येईल, या आशेवर मासेमारी करून मिरकरवाडा बंदरात येणाऱ्या नौकांना जेटीवर येण्यासाठी त्या शाकारून ठेवलेल्या नौकांचा अडथळा होत आहे. समुद्रात मासेमारी करून त्या नौकांना जेटीवर येण्यासाठी व मासळी उतरवून घेताना अडथळा येत असल्याची तक्रार सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडे मांडण्यात आली आहे.

असोसिएशनच्या तक्रारीनुसार शाकारून ठेवलेल्या नौका तेथून काढण्यासाठी मिरकरवाडा बंदर प्राधिकरणाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाकडून मिरकरवाडा बंदराचे नियंत्रण करणाऱ्या मिरकरवाडा प्राधिकरणाच्या मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आली.

त्यानुसार शाकारून ठेवण्यात आलेल्या नौकामालकांना जेटीवरील नौका हलवून भगवती बंदरात उभ्या करण्यास सूचवण्यात आले. पण त्या नौकांच्या मालकांना नोटीस देवूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पर्ससीननेट रत्नागिरी तालुका मालक असो.चे अध्यक्ष विकास उर्फ धाडस सावंत, सेक्रेटरी जावेद होडेकर, किशोर नार्वेकर, विरेंद्र नार्वेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आनंद पालव यांची भेट घेतली.

नोटीस देवूनही शाकारून ठेवलेल्या नौका जेटीवरून न हलवणाऱ्या नौका मालकांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी असेसिएशनच्यावतीने पालव यांच्याकडे करण्यात आली. जिह्यात सुमारे 275 पर्ससीननेट नौका आहेत. बहुसंख्य नौका मिरकरवाडा बंदरातील आहेत.

त्यामुळे ज्यांचा यंदाचा मासेमारी हंगाम चांगला गेला आहे, त्यांनी 10 मे पासूनच आपल्या नौका शाकारून ठेवण्यास सुरुवात केली आहे. पावसाळी बंदीपूर्वीच नौका शाकारून ठेवून जेटी अडवण्यात आली आहे. ती मोकळी कऊन देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
@ratnagiri#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediakokan newskonkan rain updateMirakwada
Next Article