For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2030 पर्यंत जपानमध्ये 6-जी सुविधा

08:41 PM Jan 21, 2020 IST | Tarun Bharat Portal
2030 पर्यंत जपानमध्ये 6 जी सुविधा
Advertisement

5-जी पेक्षा दहापट अधिक राहणार :

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जगातील अनेक देश 5-जी नेटवर्कची सुविधा देणारी यंत्रणा, प्रत्याक्षिक करण्यास सुरुवात करण्यत येत आहे. तर  निवडक देशांनी त्यांचे सादरीकरण केले आहे. तर दुसऱया बाजूला मात्र जपान येत्या 2030 पर्यंत 6-जी सुविधा आणण्याची योजना आखण्यात गुंतला आहे. उपलब्ध माहितीनुसार येणारी 6-जी सुविधाही सध्याच्या 5-जी नेटवर्कच्या तुलनेत 10 पटीने अधिक वेगवान असल्याची माहिती एका अहवालातून देण्यात आली आहे.

Advertisement

आताच्या घडीला सुरु असणारी 4-जी सेवेपेक्षा 5-जी नेटवर्क 100 पटीने वेगवान असल्याची माहिती आहे. या सुविधेचा वापर करत ग्राहक काही सेकंदात 3 तासाचा चित्रपट डाऊनलोड करु शकणार आहे. किंवा व्हच्युअल रियल्टी असणाऱया ऍपचा वापर करु शकते. परंतु सध्या 6-जी यांच्यापेक्षाही अधिक वेगवान होणार असल्याचे संकेत मांडले आहेत. 

6-जीसाठी संशोधन सोसायटी

जानेवारीत एका सरकारी-नागरिक संशोधन सोसायटीने 6-जी नेटवर्कचा सेटअप करण्याची योजना आखणार असलची माहिती जपानमधील एका वर्तमानपत्र  आणि दूरसंचार मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

चीनमध्ये 5-जी सुरू

चीनमधील प्रमुख सरकारी दूरसंचार ऑपरेटर्सकडून 5-जी वायरलेस सेवा सुरू केली आहे. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी चायना मोबाईल यांनी सांगितल्याप्रमाणे 5-जी सेवा बीजिंग, शांघाय, शेंजेनसह अन्य 50 शहरात सुविधा चालू आहे. 5-जी इंटरनेट पॅकेजची सुरवातीची किंमत 128 युआन (1290 रुपये) असल्याचे स्पष्ट केले आहे. 

Advertisement
Tags :

.