2026 फिफा विश्व चषक ड्रॉ जाहीर
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
2026 मध्ये होणाऱ्या फिफाच्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेचा शुक्रवारी काढण्यात आला. या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मेक्सिकोच्या अध्यक्षा क्लॉडीया शेनबॉम तसेच कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्ने तसेच फिफाचे अध्यक्ष उपस्थित होते.
सदर स्पर्धा फिफाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच तीन देश यजमानपद स्वीकारत आहेत. 2026 च्या विश्व चषक फुटबॉल स्पर्धेला आता 189 दिवस बाकी असताना या स्पर्धेचा ड्रॉ मोठ्या थाटात काढण्यात आला. या स्पर्धेचा विस्तार यावेळी करण्यात आला असून एकूण 48 देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. एकूण 104 सामने खेळविले जाणार आहेत. या ड्रॉ समारंभाला फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फॅटिनो यांनी सुवर्ण रंगाच्या या चषकावर निळ्या रंगाची रिबन बांधण्यात आली होती. तसेच या चषकावर पदकही लटकविण्यात आले होते. सदर स्पर्धा 11 जून ते 19 जुलै 2026 या कालावधीत होणार आहे.
गट ए - मेक्सिको, द. आफ्रिका, द. कोरिया, युरोपियन प्लेऑफ डी
गट बी- कॅनडा, युरोपियन प्ले ऑफ ए, कतार, स्वीस
गट सी- ब्राझील, मोरोक्को, हैती, स्कॉटलंड,
गट डी-अमेरिका, पराग्वे, ऑस्ट्रेलिया, युरोपियन प्ले ऑफ सी,
गट इ- जर्मनी, क्युरोकेओलव्होरी, कोस्टारिका, इक्वेडोर
गट एफ- नेदरलँड्स, जपान, युरोपियन प्ले ऑफ बी, ट्युनेशीया
गट जी- बेल्जियम, इजिप्त, इराण, न्यूझीलंड
गट एच-स्पेन, केपव्हेर्डी, सौदी अरेबिया, उरुग्वे
गट आय-फ्रान्स, सेनेगल, फिफा प्ले ऑफ 2, नॉर्वे
गट जे-अर्जेंटिना, अल्जेरिया, ऑस्ट्रीया, जॉर्डन
गट के-पोर्तुगाल, फिफा प्ले ऑफ 1, उझ्बेक, कोलंबिया
गट एल- इंग्लंड, क्रोएशिया, घाणा, पनामा.