2025 पर्यंत अदाणी सर्वात मोठी सौर ऊर्जा कंपनी उभारणार
गौतम अदाणी : वीज उत्पादन वाढविणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अब्जापती अद्योगपती असणारे गौतम अदाणी यांनी आगामी 2025 पर्यंत जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा कंपनी उभारण्याचे ध्येय असल्याचे बुधवारी सांगितले आहे. यासाठी विशेष आखणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. 2030 पर्यंत जगातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी म्हणून उदयास येणारा प्रकल्प आमच्याकडे असणार असल्याचाही विश्वास व्यक्त केला आहे.
अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये लिहले आहे. की, आमचा उद्देश आहे की 2025 पर्यंत सर्वात वेगाने जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा कंपनी उभारण्याचा संकल्प आहे. त्यानंतर 2030 पासून जगातील सर्वाधिक अक्षय ऊर्जाचे उत्पादन करणारी कंपनी म्हणून अदाणी ग्रुप उदयास येणार असल्याचे म्हटले आहे.
2019 मध्ये कारभार
अदाणी समूहाचा सौर ऊर्जा क्षेत्रात जगातील सहाव्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. तर 2020 पर्यंत अक्षय ऊर्जा कंपनी वेगाने उत्पादन करणारी कंपनी वाटचाल सुरु ठेवणार असल्याचे म्हटले आहे. तर 2021 मध्ये आम्ही मुख्य सौरऊर्जा कंपन्यांच्या यादीत समावेश होणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
18 गीगावॅट वीज निर्मिती
अक्षय ऊर्जा उत्पादन संपत्तीचा पोर्टफोलियो 2.5 गीगावॅट आहे. 2.9 गीगावॅटची उत्पादन क्षमता 2020 मध्ये दुप्पटपेक्षा अधिक होणार आहे. त्यानंतर 2025 पर्यंत ही क्षमता विस्तारत 18 गीगावॅट पर्यंत वाढविणार असल्याची म्हटले आहे.