2021-22 साठी 6.85 कोटींहून अधिकचा प्राप्तिकर परतावा
नवी दिल्ली : 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत 6.85 कोटीहून अधिक प्राप्तिकर परतावा भरण्यात आला आहे. यात 31 डिसेंबरपर्यंत वाढ होण्याचे संकेत आहेत, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. वैयक्तिक श्रेणीमध्ये 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर परतावा (आयटीआर) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती, तर कॉर्पोरेट्स आणि इतरांसाठी, ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे, त्याकरीताची तारीख 7 नोव्हेंबर 2022 ही होती. जर कोणी या शेवटच्या तारखेपर्यंत परतावा भरु शकत नसेल, तर तो दंड भरून 31 डिसेंबरपर्यंत रिटर्न भरू शकतो.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) चे अध्यक्ष नितीन गुप्ता म्हणाले, ‘आत्तापर्यंत 2022-23 च्या मूल्यांकन वर्षासाठी 6.85 कोटी प्राप्तिकर परतावा भरले गेले आहेत आणि आम्हाला 31 डिसेंबरपर्यंत ही संख्या वाढणार असल्याची अपेक्षा आहे.’