For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुटीर आमदारांविरोधातील 2019ची याचिका फेटाळली

12:42 PM Feb 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
फुटीर आमदारांविरोधातील 2019ची याचिका फेटाळली
Advertisement

2022 मधील दिगंबर कामत वगळून इतरांना नोटिसा : उत्तरे देण्यास चार आठवड्यांची न्यायालयाकडून मुदत

Advertisement

पणजी : वर्ष 2019 मध्ये काँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये सामील झालेल्या 10 आमदारांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांची अपात्रता याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून निकालात काढली आहे. दरम्यान, वर्ष 2022 मध्ये काँग्रेसमधून फुटून भाजपात प्रवेश केलेल्या 8 आमदारांच्या विरोधातील अपात्रता याचिका मात्र कायम ठेवून आमदार दिगंबर कामत वगळता इतर फुटीर आमदारांना उत्तरे देण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत.

वर्ष 2019 मधील याचिका आणि वर्ष 2022 मधील याचिकेत समानता असून पूर्वीच्या याचिकेचा प्रत्यक्षात कायदेशीर परिणाम होणे आता संभव नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने 2019 ची याचिका निकालात काढण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. वर्ष 2022 मधील याचिकेत समाविष्ट असलेल्या आठ आमदारांपैकी फक्त आमदार कामत यांनी नोटिसीला उत्तर दिल्याने त्यांना वगळून इतर सात आमदारांनी प्रत्युत्तर द्यावे, अशा नोटिसा त्यांना बजावण्यात आल्या आहेत. त्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. वर्ष 2019 ची याचिका जवळपास सहा वर्षांनी निकालात काढल्याचे आणि फेटाळल्याचे समोर आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.