2019मध्ये चीनचा जीडीपी 6.1 टक्क्यांवर
1990 नंतर सर्वात कमी विकास दराची नोंद
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील दुसरा महासत्ता असणारा देश म्हणून चीनला ओळखले जाते. परंतु सध्या या देशाचा आर्थिक विकास दर 6.1 टक्क्यांवर(जीडीपी) राहिला आहे. ही स्थिती मागील 30 वर्षांनंतर निर्माण झाल्याची माहिती चीनच्या नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (एनबीएस) आकडेवारीतून सांगण्यात आले आहे.
देशांतर्गत बाजारात मागणीत झालेली घट आणि अमेरिकासोबत सुरु असलेले व्यापार युद्ध या कारणांमुळे जीडीपीमध्ये घसरण झाल्याची नेंद करण्यात आली आहे. मागील वर्षात चीनच्या जीडीपीमध्ये स्थिरता राहली होती. परंतु जागतिक पातळीवरील विकास दर आणि व्यापारी क्षेत्रातील विकासदरात झालेली घसरण यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचा अंदाज एनबीएसचे कमिशन निंग जिझ यांनी व्यक्त केला आहे..
2018मधील स्थिती
चीन सरकारने 2019 साठी 6.6.5 टक्के विकास दर राहण्याचे अनुमान निश्चित केले आहे. परंतु या अगोदरच्या वर्षात (2018) चीनमध्ये जीडीपी दर 6.6 टक्क्यांवर राहिला आहे. 2019 च्या पहिल्या तिमाहीत चीनचा जीडीपी दरात सलगची घसरण झाली आहे.