For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

२०१६ चा हिशेब २०२६ मध्ये: विसर्जन मिरवणुकीत आवाज वाढवणे पडले महागात; १० वर्षांनी मंडळाला ३० हजारांचा दंड, ट्रॅक्टर चालकास १ वर्षाचा तुरुंगवास

09:51 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
२०१६ चा हिशेब २०२६ मध्ये  विसर्जन मिरवणुकीत आवाज वाढवणे पडले महागात  १० वर्षांनी मंडळाला ३० हजारांचा दंड  ट्रॅक्टर चालकास १ वर्षाचा तुरुंगवास
Advertisement

कोल्हापूर : विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडणे किती महागात पडू शकते, याचा धडा राजारामपुरीतील गणेश मंडळाला मिळाला आहे. २०१६ सालच्या विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम लावून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी न्यायालयाने गणेश तरुण मंडळ, राजारामपुरी गल्ली नं. १२, या मंडळाचा ट्रॅक्टर चालक-मालक अजित बाजीराव पाटील याला तब्बल ३० हजार रुपयांचा दंड आणि १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तर यापूर्वीच या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनीस, इतर सदस्य अशा पाच जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली होती.

Advertisement

गणेशोत्सव सन २०१६ मध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान, कोल्हापूर पोलीस व प्रशासनाने सर्व गणेश मंडळांना आवाजाच्या मर्यादेबाबत नोटीस बजावली होती. तरीही गणेश तरुण मंडळाने विसर्जन मिरवणूक दि. १६/०९/२०१६ मुख्य मिरवणूक मार्ग असणाऱ्यां मिरजकर तिकटी -बिनखांबी गणेश मंदिर -महाद्वार रोड -पापाची तिकटी या मार्गावरून काढण्यात आली होती. मिरवणुकीत मोठी साऊंड सिस्टीम जोडलेली होती.

मिरवणूक बिंदू चौकात आली असता, नेमलेल्या पोलीस पथकाने नॉईस लेव्हल मीटरद्वारे ध्वनी तीव्रतेचे मोजमाप घेतले. त्यावेळी ठरवून दिलेल्या डेसीबल मर्यादेपेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात साऊंड लावून, पोलिसांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मिरवणूक रेंगाळत ठेवल्याचे निदर्शनास आले. याबाबत तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, भारतकुमार राणे यांनी ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम प्रमाणे मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, इतर सदस्य, साऊंड सिस्टीम मालक व ट्रॅक्टर चालक- मालक यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्याकडून खटला पाठवला होता.

Advertisement

खटल्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंकजा राजपुत यांनी बुधवारी दिला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक-मालक अजित बाजीराव पाटील, (रा. ननुदे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) याला दोषी धरून ३० हजाराचा दंड व १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी तत्कालीन पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी पाठविलेल्या खटल्यात सायली ठोकळ यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.

Advertisement
Tags :

.