2014 नंतर प्रथमच कच्चे तेल भडकले
07:00 AM Feb 25, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकल्याचे दिसून आले आहे. सकाळच्या सत्रामध्ये ब्रेंट कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरलमागे 102 डॉलरवर पोहचले होते. युद्धामुळे युरोपमधून कच्च्या तेलाच्या पुरवठय़ावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. या आधी 2014 मध्ये सप्टेंबर महिन्यात कच्च्या तेलाचे दर 101 डॉलरवर पोहचले होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article