महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘व्हीआय’चे भागधारक 20,000 कोटी उभारणार

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडिया (व्हीआय) ला त्यांच्या भागधारकांकडून रोखे जारी करून 20,000 कोटी रुपये उभारण्यासाठी परवानगी मिळाली आहे. आर्थिक संकटाचा प्रवास करणाऱ्या दूरसंचार ऑपरेटरने गुरुवारी या संदर्भातील माहिती शेअर बाजाराला दिली आहे. यामध्ये भागधारकांची मंजुरी मिळविण्यासाठी आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, 85 टक्के भागधारकांनी या ई-मतदानात भाग घेतला, तर नव्याने निधी उभारण्याच्या बाजूने 99 टक्के मते पडली आहेत.

Advertisement

तर 5जी सेवा होणार सुरु

Advertisement

तथापि, संचालक मंडळाने दिलेली मंजुरी ही कंपनीने उभारल्या जाणाऱ्या 45,000 कोटी रुपयांच्या प्रारंभिक रकमेच्या निम्म्याहून कमी आहे. फेब्रुवारीमध्ये, व्हीआयच्या संचालक मंडळाने इक्विटी आणि कर्ज या दोन्ही माध्यमातून 45,000 कोटी उभारण्यास मंजुरी दिली होती. या रकमेसह दूरसंचार क्षेत्रातील मोठी कंपनी आपले 4 जी नेटवर्क वाढवू शकते आणि 5जी सेवा सुरू करू शकते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article