For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झी एंटरटेन्मेंट उभारणार 2000 कोटी

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
झी एंटरटेन्मेंट उभारणार 2000 कोटी
Advertisement

नवी दिल्ली : तोट्यामधून नफ्यात आलेली झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायजेस लिमिटेड या कंपनीला 2000 कोटी रुपयांची उभारणी करण्याला संचालक मंडळांनी मंजुरी दिली आहे. झी एंटरटेन्मेंटने सदरची माहिती शेअर बाजाराला गुरुवारी दिली. गुरुवारी सकाळी रक्कम उभारणी संदर्भात चर्चा करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. सदरच्या बैठकीमध्ये रक्कम उभारणी करण्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. इक्विटी समभाग, परिवर्तनीय आणि बिगरपरिवर्तनीय रोख्यांच्या माध्यमातून कंपनी वरील रक्कम उभारणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मात्र कंपनीकडून स्पष्टता करण्यात आलेली नाही. याच दरम्यान कंपनीचा समभाग शेअर बाजारात इंट्रा डे दरम्यान 7 टक्क्यांपर्यंत वधारलेला पाहायला मिळाला. 157 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर कंपनीचा समभाग पोहोचला होता. यात शेवटी घसरण होऊन समभाग 4.76 टक्के वाढत अखेर 154 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे बाजार मूल्य 14,792 कोटी रुपयांवर पोहोचले.

Advertisement

Advertisement
Tags :

.